शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

दोन लाखांची रोकड जप्त

By admin | Updated: September 23, 2014 23:02 IST

अहमदनगर : नगर-कल्याण रोडवर एका वाहनामधून नेण्यात येत असलेली दोन लाख रुपयांची रक्कम निवडणूक शाखेच्या पथकाने जप्त केली आहे.

अहमदनगर : नगर-कल्याण रोडवर एका वाहनामधून नेण्यात येत असलेली दोन लाख रुपयांची रक्कम निवडणूक शाखेच्या पथकाने जप्त केली आहे. या प्रकरणी कारवाईसाठी तोफखाना पोलीस ठाण्यात प्रकरण देण्यात आले आहे. सदर रक्कम निवडणुकीच्या कारणासाठी नसल्याचे स्पष्ट झाल्याने रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.आचारसंहिता लागू झाल्यानंतर जिल्हा निवडणूक शाखेच्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाद्वारे दररोज वाहनांची तपासणी करण्यात येते. वाहनांमध्ये अवैध दारू, रोख रक्कम आहे का याची तपासणी केली जाते. पथकाचे प्रमख सुमित घोरपडे, सहायक फौजदार कैलास शिरसाट, ए.आय. शेख, दिगंबर शेलार यांच्या पथकाने सकाळपासून नगर-कल्याण रोडवर वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये भाळवणी-नगर रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनामध्ये ( एम.एच.-१४, डीएल.- ८५७०) दोन लाख रुपयांची रक्कम आढळून आली. दोन लाख रुपये हे नवीन वाहन खरेदी करण्यासाठी घेवून जात असल्याचे वाहन चालकाने सांगितले. मात्र त्याबाबतचा काहीही पुरावा नसल्याने पथकाने वाहनचालक माणिक महादेव खेडकर याच्यासह वाहनामधील तिघांना रकमेसह ताब्यात घेतले. पथकाने पुढील कारवाईसाठी हे प्रकरण तोफखाना पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या पैशांची चौकशी करण्याचे काम सुरू होते. (प्रतिनिधी)दोन लाख रुपयांबाबत ठोस पुरावा संबंधित देऊ शकलेले नाहीत. मात्र सदरच्या पैशाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. याबाबत चौकशी सुरू असून त्यामध्ये तथ्य आढळल्यास कारवाई होईल.- लक्ष्मण काळे, पोलीस निरीक्षक, तोफखाना