श्रीरामपूर : राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील २ लाख अंगणवाडी कर्मचारी सोमवार ११ सप्टेंबरपासून राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संपावर जाणार असल्याचे समितीचे पदाधिकारी राजेंद्र बावके यांनी सांगितले.वेतनवाढीसाठी सरकारने ‘मानधन वाढ समिती’ गठित केली होती. समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार मानधन वाढी संदर्भात मे २०१७ पर्यंत सरकारी आदेश काढण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले होते. मात्र आजपर्यत याबाबत सरकारी पातळीवर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ११ सप्टेंबरपासून राज्यातील २ लाख अंगणवाडी संपावर जात आहेत. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचा-यांनी या संपामध्ये सहभागी होण्याचे आवाहन राजेंद्र बावके,बाळासाहेब सुरुडे,मदिना शेख, शरद संसारे, जीवन सुरुडे, माया जाजू, इंदूबाई दुशीग,शोभा लांडगे,नंदा पाचपुते, संजीवनी आमले, रतन गोरे,लक्ष्मी चव्हाण,मन्नाबी शेख,सुजाता शिंदे, रागिनी जाधव, मीना कुटे, वंदना गमे,शर्मिला रणधीर, सुनंदा नाईक,शोभा विसपुते,नजराणा शेख,मुक्ता हासे आदींनी केले आहे. संपाच्या दुस-च दिवशी १२ सप्टेंबरला कृती समितीमधील सर्व ७ संघटना मुंबईतील आझाद मैदानात तीव्र निदर्शने करणार आहेत...................................मानधनवाढ समिती गठीतराज्यात वर्षभर अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनवाढीची प्रक्रिया सुरू आहे. २० जुलै २०१६ ला महिला व बालविकास विभागाने मानधनवाढ समितीचा शासकीय आदेश जारी केला. त्यानंतर सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या अनेक बैठका झाल्या. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने सरकारशी वेळोवेळी याबाबत चर्चा करूनही प्रश्न न सुटल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. मिळालेल्या आश्वासनानुसार कृती समितीने ३० मे पर्यंत म्हणजे दोन महिने वाट पाहिली व ३१ मे रोजी पुन्हा एकदा आझाद मैदानात आंदोलन केले. मानधनवाढीच्या प्रस्तावाची प्रक्रिया सुरू असून लवकरच मुख्यमंत्र्यासोबत बैठक घेण्यात येईल असे समजल्याने वाट पाहण्याचा निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यात कोणताही निर्णय न झाल्यामुळे जिल्हा व राज्य पातळीवर आंदोलने केल्यानंतर ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला.