शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकी अपघातात दोन ठार

By admin | Updated: June 27, 2016 01:01 IST

संगमनेर : मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघातात दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात घडली.

संगमनेर : मालवाहू ट्रक व दुचाकीची समोरासमोर धडक होवून अपघातात दोन परप्रांतीय जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राम आशिषचंद्रिका यादव (वय ४४) व मोहंमद शबूअली (दोघे मूळ बिहार, हल्ली रा. अंबड, नाशिक) हे दोघे दुचाकीवरून (एम. एच. १५, र्ई. एम. ७६६८) नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाने आळेफाट्याहून संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी माहुली शिवारात संगमनेहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालवाहू ट्रकची (एम. एच. १२, के. पी. ६५०२) दुचाकीला समोरून जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील यादव व शबूअली हे दोघे गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाले. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मयत हे बिहार राज्यातील असून यादव हा बांधकाम ठेकेदार तर शबूअली हा त्याच्याकडे कामाला होता. दोघेही अंबड (नाशिक) येथे वास्तव्यास होते. कामानिमित्त ते दुचाकीवरून आळेफाट्याला गेले होते. घरी परतताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी घारगाव पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. सायंकाळी पोलिसांनी संतोष पवार (रा.घोळेवाडी, ता.पाटोदा, जि.बीड) या ट्रक चालकास अटक केली.(प्रतिनिधी) भिंगार : नगर -जामखेड रोडवर टँकर व जीप यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत जीप चालक नितीन बाजीराव राठोड (वय २७, रा. शिवाजीनगर, नेप्ती रोड) हे जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी सकाळी घडला.लातूरकडून नगरकडे येणारा टँकर (टीएल १६-ए ७६६३) आणि नगरकडून जामखेडच्या दिशेने जाणारी स्कार्पिओ जीप (टीएल १६, एके-१७५०) यांच्यात हॉटेल उत्सवसमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जीपचालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने बाजूला सारत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर रोडवर राठोड यांच्या पाहुण्यांच्या वाहनाला अपघात झाला होता. त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले होते. त्यांना तुळजापूर येथून आणण्यासाठी राठोड हे जीप घेवून तुळजापूरकडे निघाले होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली. (वार्ताहर)