राहुरी : देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी परिसरातील मंगळवारी पहाटे दोन घरांना आग लागल्याची घटना घडली. या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या जळीतग्रस्त कुटुंबाना चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड यांनी तातडीची आर्थिक मदत केली.शेटेवाडी येथे अशोक बाबूराव जंगले यांचे छपराचे घर आहे. मंगळवारी पहाटे जंगले यांच्या घराला आग लागली. आगीमुळे घरातील किराणा साहित्य, संसारोपयोगी वस्तू सर्व जळून खाक झाले. या घटनेत जंगले यांच्या घरातील सुमारे अडीच लाख रूपयांचे नुकसान झाले. तर शेजारी असलेल्या सुखदेव रघुनाथ नरसाळे यांच्या घराला आग लागल्याने त्यांच्या स्वयंपाक घरातील साहित्य जळून खाक झाले. नरसाळे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. घटना घडल्याचे समजताच चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशराव भांड यांनी पाहणी करून दोन्ही जळीत कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.
देवळाली प्रवरामधील दोन घरांना आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 16:59 IST