शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अकोले तालुक्यामधील नवलेवाडीतील दोन हॉटेलचे दारू परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 19:15 IST

तालुक्यातील नवलेवाडी हद्दीतील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्यात आले आहेत. तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे.

अकोले : तालुक्यातील नवलेवाडी हद्दीतील हॉटेल पथिक व हॉटेल विजय या दोन दारू दुकानांचे दारू परवाने रद्द करण्यात आले आहेत. तालुका दारुबंदी आंदोलनाने केलेल्या तक्रारींनुसार जिल्हाधिकारी यांनी हे आदेश दिले आहे.१ एप्रिल २०१७ ला बंद केलेली दारु दुकाने पुन्हा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. पण ते आदेश देताना फक्त नगरपरिषद, नगरपंचायत व महानगरपालिका यांच्या हद्दीतील दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली. हॉटेल पथिक व हॉटेल विजय हे नवलेवाडी या ग्रामपंचायत हद्दीत असल्याने ते सुरू होत नसूनही उत्पादन शुल्क अधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करीत ही दोन्ही दुकाने पुन्हा सुरू केली. याबाबत आॅक्टोबर २०१७ मध्ये दारुबंदी आंदोलनाने उत्पादन शुल्क अधीक्षक व संगमनेर उत्पादन शुल्क अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. संगमनेर येथील अधिकारी यांनी जवळपास सात महिने वेळकाढूपणा केला. नकाशा मागविणे, त्याबाबतचे स्पष्टीकरण मागविणे असे अनेक कागदपत्रे मागवून शेवटी काहीच निर्णय घेतला नाही. दारूबंदी कार्यालयाने दोन्ही अधिकाऱ्यांना सतत फोन विनंती करूनही दोन्ही अधिकाºयांनी ७ महिन्यात अकोल्यात तक्रारदारांची भेट घेतली नाही. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्पादन शुल्क आयुक्त यांचेकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी आदेश दिल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात योग्य अंतर व नियम पूर्तता करूनच परवाना सुरू करणे आवश्यक होते, अशी स्पष्ट नाराजी जिल्हाधिकाºयांनी नोंदवून पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ बंद करण्यात येत आहे असे आदेश दिले आहेत.उत्पादन शुल्क अधिकारी जबाबदारमुख्यमंत्री, आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत दारुबंदी आंदोलनाचे हेरंब कुलकर्णी, संतोष मुतडक, निलेश तळेकर, संदीप दराडे, सुनील उगले यांनी पाठपुरावा केला. त्याचबरोबर संगमनेर येथील उत्पादन शुल्क अधिकारी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा अपमान करून चुकीच्या पद्धतीने दुकान सुरू केल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी आंदोलनाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले