शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेरात दोन गटांमध्ये धुमश्चक्री

By admin | Updated: April 20, 2016 00:09 IST

संगमनेर : मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या प्रचंड धुमश्चक्रीत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील जेधे कॉलनीत घडली.

संगमनेर : मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटात झालेल्या प्रचंड धुमश्चक्रीत तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना शहरातील जेधे कॉलनीत घडली. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोन्ही गटाच्या एकूण १० जणांविरूध्द गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. शहरातील जेधे व कतारी यांच्या दोन गटामध्ये काही दिवसांपूर्वी भांडणे व हाणामाऱ्या झाल्या होत्या. मागील भांडणाचा राग मनात धरून सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा संजय गांधीनगरमधील अर्जुन सुरेश कतारी, करण मच्छिंद्र कतारी, सचिन प्रताप कतारी, मनोहर सुवा जाधव व गौतम कतारी यांनी संगनमताने अनिकेत गणेश जेधे (वय १६) यास लोखंडी गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तर अर्जुन कतारी व मनोहर जाधव हे शनी मंदिरातून देवदर्शन घेवून घरी परत येत असताना जेधे कॉलनीमधील आकाश जेधे, अंकुश जेधे, अविनाश जेधे, अनिकेत जेधे व योगेश जेधे यांनी लाकडी बॅट व स्टम्पने कतारी व जाधव यांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. हा प्रकार जेधे कॉलनीत घडला. याप्रकरणी अनुक्रमे सविता गणेश जेधे व अर्जुन कतारी यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली. त्यावरून शहर पोलिसांनी वरील दोन्ही गटाच्या एकूण १० जणांविरूध्द जीवे मारण्याचा कट, हाणामारी व गंभीर दुखापत करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. तर गौतम कतारी यास पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक विनय सरवदे करीत आहेत.(प्रतिनिधी)