शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जमीनीच्या वादावरुन दोन गटात हाणामारी: एकाचा मृत्यू, बारा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:22 IST

पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे गायरान जमिनीत पाणलोट विकासाचे काम सुरू असताना ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ मारहाणीत जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार (वय ३५)यांचा उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेत बारा जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथे गायरान जमिनीत पाणलोट विकासाचे काम सुरू असताना ग्रामस्थ व स्थानिक रहिवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ मारहाणीत जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार (वय ३५)यांचा उपचारा दरम्यान बुधवारी मृत्यू झाला. या घटनेत बारा जण गंभीर जखमी झाले आहेत.कळसपिंप्री ग्रामपंचायतीच्या हद्दीत ५० एकर गायरान जमीन आहे़ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या जमिनीवर पाणलोट विकासाचे काम सुरू आहे़ या जमिनीवर हक्क सांगणाऱ्या रहिवाशांनी या कामाला विरोध केला होता़ याबाबत गावाचे सरपंच बद्रिनाथ येढे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता़ मंगळवारी (दि. २८)दुपारी या जमिनीत पोकलेन मशीन नेऊन खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले होते़ यावेळी मैनाबाई बर्डे, शोभा बर्डे, बाळू गायकवाड, कंस पवार व इतर दहा ते पंधरा जणांनी या कामाला विरोध केला़ यावेळी वाद वाढून कळसपिंप्रीचे ग्रामस्थ व जमिनीवर हक्क सांगणाºयांमध्ये जोरदार हाणामारी झाली़ दगड, काठ्या, गलोलीच्या सहाय्याने एकमेकांवर हल्ला करण्यात आला़ या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कंस लक्ष्मण पवार यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला़ तर मैनाबाई बर्डे, शोभा बर्डे, बाळू गायकवाड यांच्यासह सरपंच बद्रीनाथ येढे, संदीप मिसाळ, भगवान सोनवणे, विश्वनाथ बुळे, कमलाकर गाडे, दादासाहेब झिरपे, संदीप मिसाळ यांच्यासह दहा ते बारा जण जखमी झाले़ जखमींना प्रथम पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात व त्यानंतर नगर येथे हलविण्यात आले़ या घटनेबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी