अहमदनगर : कोरोना काळात विवाहाचे प्रमाण घटले, असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. गेल्या तीन वर्षांतील विवाह नोंदणीची आकडेवारी पाहता त्यात फारशी घट झालेली नाही. त्यामुळे कोरोना असला तरी विवाह थांबलेले नव्हते, हे यावरून स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यावर गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. मागील वर्षी कोराना होता. पहिल्या लाटेत विवाह सोहळ्यांना गर्दी करण्यास बंदी होती. दुसऱ्या वर्षीही प्रशासनाने गर्दी करण्यास बंदी घातलेली होती; परंतु अशाही परिस्थितीत अनेकांनी विवाह उरकून घेत दोनाचे चार हात केले. घरातील कार्य उरकून त्याची सरकारी दप्तरी नोंदही केली. दोन्ही कुटुंबातील मंडळींनी एकत्र विवाह लावले. कुठलाही डामडौल नाही. गर्दी नाही, असेच विवाह सोहळे झाले. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणावर व कमी खर्चात, कमी गर्दीत विवाह झाले. लॉकडाऊन सुरू असला तरी विवाह सोहळ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
....
कधी किती झाले नोंदणी विवाह
सन २०१८- ३३८
सन- २०१९-३८९
सन- २०२०- ३८१
सन २१२१
जानेवारी- ४१
फेब्रुवारी- ३१
मार्च- ३३
एप्रिल- ३४
मे- २७
जून- ३६
...
सहा महिन्यांत दोनशे विवाह
चालू वर्षात गेल्या सहा महिन्यांत २०२ विवाहांची नोंदणी करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांत लॉकडाऊन होता. लॉकडाऊन असला तरी विवाह पार पडले असून, नियमांचे पालन करून घरगुती पद्धतीने विवाह करण्यात आले आहेत.
...
- लॉकडाऊन असला तरी विवाह नोंदणीत फारसा परिणाम झालेला नाही. जिल्ह्यातील गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी पाहता विवाह थांबलेले नाहीत. विवाह सुरूच असून, त्याची नोंदही करण्यात आली आहे.
- कणसे, मुदांक शुल्क विभाग