शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून दोन शेतकरी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 18:52 IST

कोपरगाव : तालुक्यातील भोजडे व कोळगावथडी या दोन गावात शुक्रवारी वीज पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये दोन शेतकरी जखमी ...

कोपरगाव : तालुक्यातील भोजडे व कोळगावथडी या दोन गावात शुक्रवारी वीज पडल्याच्या घटना घडल्या. या घटनांमध्ये दोन शेतकरी जखमी झाले तर एक महिला बालंबाल बचावली आहे.शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरणानंतर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तालुक्याच्या ग्रामीण भागात तुरळक पावसाला सुरूवात झाली. याचवेळी वारी शिवारात रंगनाथ सांगळे यांच्या शेतामध्ये कांद्याची लागवड सुरू होती. पाऊस आल्याने लिंबाच्या झाडाखाली आश्रयास थांबलेल्या मारूती जेऊघाले (वय ५५) व रावसाहेब धट (वय ४३) यांच्या अंगावर विज पडून ते जखमी झाले. त्यांच्या शरिराचा ३० टक्के भाग भाजला. जखमींना वारीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन उपचार करण्यात आले. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान दुपारी दोन वाजता कोळगावथडी येथे रंगनाथ परसराम देवकर यांच्या घरावर विज पडून पंखा, टिव्ही, विद्युत मोटार, विजेच्या तारा, बल्ब आदींसह संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. घरात एकट्या असलेल्या अरूणा देवकर यांनी प्रसंगावधान राखल्याने त्या बालंबाल बचावल्या. तसेच शेजारील सोपान शामराव आढाव यांच्या घराच्या लोखंडी प्रवेशद्वाराला विज चाटून गेल्याने ठिणग्या पडल्या. घटनेची माहिती समजताच विलास आढाव, शांताराम उगले, बाबासाहेब लुटे, अंबादास कवडे, सागर आढाव, विठ्ठल लुटे यांनी मदतकार्य केले.