महिला व बाल कल्याण विभागांतर्गत हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. १९ मार्च रोजी दौऱ्यावर गेलेले हे सदस्य २४ मार्च रोजी नगर जिल्ह्यात दाखल झाले. नगरमध्ये आल्यानंतर खबरदारी म्हणून या सर्वांनी कोरोनाची चाचणी केली असता गुरुवारपर्यंत आलेल्या अहवालात दोन महिला सदस्य पॉझिटिव्ह आढळल्या, तर इतर सदस्यांसह कर्मचाऱ्यांचे अहवाल येणे बाकी होते.
या दौऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, माजी अध्यक्षा शालिनी विखे, अनुराधा नागवडे, रोहिणी निघुते, पुष्पा रोहम, पोर्णिमा जगधने, राणी लंके या महिला सदस्यांसह नेवाशाचे प्रकल्प अधिकारी ढाकणे, अध्यक्षांचे स्वीय सहायक किशोर शिंदे तसेच परिचर श्रीकांत ढगे अशा बारा जणांचा समावेश होता.