शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

साईबाबा पतसंस्थेत दोन कोटींचा अपहार; व्यवस्थापक, कॅशियरवर गुन्हा

By admin | Updated: May 18, 2017 15:45 IST

लेखापरिक्षणात पतसंस्थेचे व्यवस्थापक व कॅशियर यांनी संगनमताने २ कोटी १६ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले.

आॅनलाईन लोकमतबोटा (अहमदनगर), दि़ १८ - संगमनेर तालुक्यातील साकुर बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापक व कॅशियर यांनी संगनमताने तब्बल २ कोटी १६ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुदत संपलेल्या ठेवींची रक्कम मिळण्यासाठी साईबाबा सहकारी पतसंस्थेच्या सभासद ठेवीदार संस्थेकडे वेळोवेळी मागणी करीत होते़ मात्र, ठेवी मिळत नव्हत्या़ त्यामुळे त्यांनी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात संगमनेर प्रांत कार्यालयासमोर ठेवी परत मिळाव्यात व संस्थेच्या कारभाराची चौकशी करावी, यासाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपनिबंधकांनी उपोषणकर्त्या सभासदांची भेट घेऊन या संदर्भात तातडीने चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. सहकारी पतसंस्था लेखापरिक्षक संतोष रंगनाथ पंधारे यांनी केलेल्या लेखापरिक्षणात पतसंस्थेचे व्यवस्थापक व कॅशियर यांनी संगनमताने २ कोटी १६ लाख रूपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे उघडकीस आले. लेखापरिक्षक संतोष पंधारे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून या पतसंस्थेचे व्यवस्थापक रावसाहेब कारभारी टेकुडे (रा. टेकुडवाडी, देसवडे, ता़ पारनेर) व कॅशियर सीताराम मनोहर शेंडगे (रा मांडवे बुद्रुक, ता़ संगमनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साकुर बिरेवाडी येथील साईबाबा सहकारी पतसंस्थेमध्ये १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंत व्यवस्थापक रावसाहेब टेकुडे व कॅशियर सीताराम शेंडगे यांनी संगनमताने संस्थेच्या पावत्यांवर व चेकवर खोट्या सह्या करून संस्थेच्या जमा झालेल्या रोख रकमा व ठेवी बँकेमध्ये भरणा न करता स्वत:कडे ठेवल्या़ तसेच संस्थेच्या खाते असलेल्या वेगवेगळ्या बँकांतून रोख रकमा तसेच मुदतपूर्व ठेवीच्या रकमा खोटे ठराव तयार करून संस्थेच्या डे बुकला नोंदी न करता काढून घेतल्या़ तसेच जिल्हा बँकेच्या साकुर शाखेच्या लॉकरमध्ये ठेवलेले संस्थेच्या सभासदांचे दागिनेही परस्पर काढले. यामध्ये या दोघांनी सुमारे २ कोटी १६ लाख रूपयांचा अपहार करून सभासद व ठेवीदार यांची फसवणूक केली. घारगावचे पोलीस निरीक्षक दिलीप निघोट पुढील तपास करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी फरार झाले आहेत.