घरासमोर बांधलेल्या पाळीव गायींवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्याने गायींनी आवाज केला. अचानक झालेल्या हल्ल्याने घरातील महिला घाबरल्या. घराकडे झालेला मोठा आवाज ऐकून शाळेजवळ शेकत असलेले मच्छिंद्र दुधावडे हे घराकडे आले. त्यांना बिबट्याने गायींवर हल्ला केल्याचे दिसले. आरडाओरडा करून त्यांनी बिबट्याला पळवून लावले.
..................................
कोपरगाव बाजार समितीवर प्रशासक
कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावाला ब्रेक लावून सोमवारी (दि.७) जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी कोपरगावचे सहायक निबंधक एन. जी. ठोंबळ यांची बाजार समितीत प्रशासक म्हणून नियुक्ती केली. प्रशासक ठोंबळ यांनी सोमवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. मुदतवाढीचा प्रस्ताव दाखल केल्याच्या ५८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी बाजार समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आला.
....................
वालवड घाटातील वनक्षेत्र आगीत खाक
कोंभळी (जि. अहमदनगर) : कर्जत तालुक्यातील वन्यजीव व वनविभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यानंतर जंगल संवर्धनासाठी परिसरात जाळरेषा आखण्याचे काम केले जाते. मात्र, नुकतीच वालवड घाटात अशीच आग लागून अंदाजे एक ते दोन हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले. त्यात वन्यजीव विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन तात्काळ जाळरेषा तयार करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
.......................