शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंबी परिसरात बिबट्याचे दोन बछडे आढळले; वनखात्याने लावला पिंजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 15:55 IST

राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क राहुरी : राहुरी तालुक्यातील आंबी गावातील शेतकरी रवींद्र कोळसे यांच्या स्वमालकीच्या शेतात गट नं. ७७ मध्ये उसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळून आली आहेत. दरम्यान, बिबट्याची मादी जेरबंद करण्यासाठी वनखात्याने रविवारी पिंजरा लावला आहे.             आंबी येथील शेतकरी दीपक कोळसे हे रविवारी सकाळी गायीच्या चाºयासाठी ऊस तोडणी करत असताना त्यांना दोन  बिबट्याची बछडे आढळून आली. यावेळी  तेथे पिलांची आई नसल्यामुळे त्यांच्या जिवीतास हानी पोहाचली नाही. बिबट्याचे बछडे  दिसताच  घाबरलेल्या परिस्थितीत त्यांनी सरपंच अशोक साळुंके, पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे, पत्रकार संदीप पाळंदे यांना माहिती दिली. काही क्षणात तेथे वनखात्याचे कर्मचारी दाखल झाले. वन अधिकारी एस. एस. चव्हाण, एम. डी. हारदे, एम. एच. पठाण यांना तातडीने बछडे आढळल्याची माहिती दिली. तोपर्यंत बछडे पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.          खबर मिळताच वन अधिकारी  एम.डी.हारदे, एम.एच.पठाण काही मिनिटांतच हजर झाले. सरपंच, पोलील पाटील व गावकºयांशी चर्चा केल्यानंतर गांभीर्य ओळखून त्यांनी पिंजरा लावण्याचा निर्णय घेतला.  संक्रापूर येथील जाधव वस्तीवरून लगेच पिंजरा आणून बछडे आढळले त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला.        याकामी संक्रापूर येथील शाम जाधव, आंबी येथील गणेश जाधव, विशाल वायदंडे, शाहरुख इनामदार, रवींद्र कोळसे, हरिभाऊ साळुंके, अजय पाळंदे आदींनी सहकार्य केले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग