शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन एकरातील टोमॅटोची माती; कुळधरणच्या शेतक-याची व्यथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 12:41 IST

कुळधरण (ता. कर्जत) येथील एका शेतक-याला दोन एकरातील टोमॅटोची माती झाली. शेतक-याने हा टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. यामध्ये त्याचे लाखोंचे नुकसान झाले. 

बाळासाहेब सुपेकर । कुळधरण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने पुण्या-मुंबईकडे जाणारी मालवाहतूक बंद आहे. त्यामुळे कुळधरण (ता. कर्जत) येथील एका शेतकºयाला दोन एकरातील टोमॅटोची माती झाली. शेतक-याने हा टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. यामध्ये त्याचे लाखोंचे नुकसान झाले. येथील शेतकरी बापूराव नारायण जाधव याने दोन एकरात टोमॅटोची लागवड केली. त्यांनी दोन एकरातील टोमॅटोवर रोपे, खते, औषधे, मशागत, तार, काठी अशा गोष्टींसाठी तब्बल दोन लाख रूपये खर्च केला होता. वारंवार हवामान बदल झाल्याने त्यांना कीटकनाशक फवारणीचा खर्चही अधिक झाला. उन्हाळी हंगाम असल्याने पाणीही अत्यल्प होते. तरीही त्यांनी योग्य नियोजन करून टोमॅटो जगविला. योग्य नियोजन असल्याने टोमॅटोही चांगला आला होता. त्यांना त्यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र झाले उलटेच. लॉकडाऊनच्या काळात विक्री न झाल्याने टोमॅटो शेतातच राहिला. अखेर त्यांनी टोमॅटो उपटून मेंढ्यांना टाकला. लॉकडाऊनमुळे शेतामधील भाजीपाला, शेतमाल विक्रीसाठी मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत नेता आला नाही. तसेच परिसरातील सर्व आठवडे बाजाराही बंद आहेत. त्यामुळे टोमॅटो शेतातच राहिला. त्यातच आधुनिक पद्धतीने लागवड केल्याने खर्चही अधिक झाला होता. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले, असे कुळधरण येथील टोमॅटो उत्पादक बापू जाधव यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत