शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ओगदी येथील दरोड्यातील दोन आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील जोरवर या शेतकरी कुटुंबावर ९ जानेवारीला पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास तीन ...

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथील जोरवर या शेतकरी कुटुंबावर ९ जानेवारीला पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी दरोडा टाकून घराचा दरवाजा दगडाने तोडून घरातील रोख रकमेसह कपाटातील दागिने असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला होता, तसेच दरोडेखोरांनी घरात एकट्याच असलेल्या कमलबाई लक्ष्मण जोरवर (वय ४५) यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी करून दरोडेखोर फरार झाले होते.

दरम्यान, १२ जानेवारीला येवला तालुक्यातील हॉटेल दशमेरा परिसरात एकूण ६ दरोडेखोर चारचाकी गाडीत चोरीच्या तयारीत दबा धरून बसलेले असताना, त्यांना येवला व नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले आहे. त्या सहा दरोडेखोरांपैकी ओगदी येथील दरोड्यातील सचिन उर्फ संजय उर्फ बोंग्या सखाहरी चव्हाण (रा. पढेगाव ता. कोपरगाव) व सचिन विरुपन्न भोसले (रा. गंगापूर जि. औरंगाबाद) हे दोघांना अटक केली आहे, तर त्यांचा तिसरा साथीदार अद्याप फरार आहे. अटक केलेल्या दरोडेखोरांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, लवकरच कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी शनिवारी (दि.१६) दिली आहे.