शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वीस जणांना शहरबंदी

By admin | Updated: August 27, 2014 23:09 IST

अहमदनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारहाण आणि दंगलीच्या गुन्ह्यातील २० जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.

अहमदनगर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मारहाण आणि दंगलीच्या गुन्ह्यातील २० जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता गणेशोत्सव काळात शहर बंदीचे आदेश दिले आहेत.गणेशोत्सव एक दिवसावर येऊन ठेपला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी शहरात प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोतवाली पोलिसांनी शहराच्या हद्दीतील मारहाण, दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेणे सुरू केले आहे. तब्बल २० जणांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता शहर बंदी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना शहराबाहेर पाठविण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे.कारवाई करण्यात आली त्यांची नावे अशी: विशाल बबन हुचे (वय २३), सागर सुभाष ठोंबरे (वय २०), राहुल सतीश शर्मा (वय २४), अनिल बाबुराव जाधव (वय ३८), नंदू लक्ष्मण बोराटे (वय ३१), करण सुनील ढापसे (वय २३), निलेश जगदीश खांडरे (वय २७), कैलास मधुकर धुपधरे (वय ४१), अमित शिवाजी वराडे (वय २१), रोहित वसंत फड (वय २३), सागर लहानु ढुमणे (वय २४), सूरज सुभाष जाधव (वय २३), अमोल दिलीप साळुंके (वय ३१), शिवकुमार बापू शेळके (वय २३), सचिन सदाप्पा खताळे (वय ३०), स्वप्निल उर्फ सोन्या राजेंद्र दातरंगे (वय २४), तबरेज आय्युब तांबुळी (वय ३०), घनशाम दत्तात्रय बोडखे (वय ३०), निलेश किसन भिंगारे (वय २४), पप्पू गुलचरण पंजाबी (वय ३०) अशी त्यांची नावे आहेत. ही नावे फक्त कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. तोफखाना हद्दीतील आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)फ्लेक्सवरील मजकुरासाठी ‘एनओसी’गणेशोत्सव काळात शहरात लावल्या जाणाऱ्या फ्लेक्सवरील मजकुराबाबत फ्लेक्स लावणाऱ्यांना पोलीस ठाण्यातील ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. असे प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिकेने फ्लेक्स लावण्यास कोणतीही परवानगी देऊ नये, असे पत्रच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण हनपुडे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना दिले आहे. फ्लेक्सवरील मजकुरावरून कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी अशा प्रकारची एनओसी बंधनकारक असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मजकूर दाखविल्याशिवाय आता त्याला परवानगी मिळणार नाही.