शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बस उलटल्याने बारा विद्यार्थी जखमी

By admin | Updated: July 23, 2016 00:14 IST

संगमनेर : भरधाव वेगाने जाणारी एस. टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले़ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर शिवारात हा अपघात घडला.

संगमनेर : भरधाव वेगाने जाणारी एस. टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले़ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर शिवारात हा अपघात घडला.संगमनेर आगाराचीएम.एम. ०७ सी. ७३४७ क्रमांकाची बस प्रवासी घेऊन मिर्झापूरहून संगमनेरकडे येत असताना एका उतारावर चालक अमोल एकनाथ धनवटे याचा ताबा सुटला. मिर्झापूर शिवारातील स्मशानभूमीजवळ ही बस पलटी झाली. या बसमध्ये प्रवाशांबरोबरच मिर्झापूर व नांदूरीदुमाला येथील शालेय विद्यार्थी प्रवास करीत होते. बस उलटी झाल्याने प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यामुळे ग्रामस्थांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. बसमधील १२ विद्यार्थी जखमी झाले होते. या विद्यार्थ्यांच्या हाता पायाला किरकोळ जखमा झाल्या. ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना बाहेर काढून त्वरित उपचारासाठी संगमनेरातील खाजगी रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. अपघाताची माहिती मिळताच लगतच्या गावातील पालकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची फिर्याद निशा राजेंद्र वाकचौरे हिने तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी चालका विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अपघातातील जखमी विद्यार्थीया अपघातात निशा राजेंद्र वाकचौरे (वय १८), भाग्यश्री ज्ञानेश्वर वलवे (वय १६), स्वाती मारूती कवडे (वय १८), आकांक्षा नवनाथ मदने (वय १६), राजेंद्र शिवाजी मदने (वय १७), अविनाश रेवजी नेहे (वय १७), अनिल शंकर शिंदे (वय १७), सचिन सयाजी वलवे (वय १८), सुधीर बाळासाहेब वलवे (वय १७), सुशिल नामदेव हांडे (वय १७) संकेत अनिल वलवे (वय १७) या विद्यार्थ्यांसह चालक व वाहक किरकोळ जखमी झाले.