शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बारा तासांत ओरबाडले नऊ महिलांचे सव्वापाच लाखांचे दागिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:22 IST

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चोरट्यांनी पहिली चोरी शहरातील बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलजवळ केली. त्यानंतर सायंकाळी सावेडी उपनगरात पाइपलाइन रोड, ...

सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चोरट्यांनी पहिली चोरी शहरातील बालिकाश्रम रोडवरील चिंतामणी हॉस्पिटलजवळ केली. त्यानंतर सायंकाळी सावेडी उपनगरात पाइपलाइन रोड, गुलमोहर रोड, एकवीरा चौक ते प्रोफेसर कॉलनी येथे महिलांचे दागिने ओरबाडले. याच दिवशी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मार्केट यार्ड, आनंदधाम रोड, नंदनवल लॉन व बुरूडगाव रोडवर महिलांचे दागिने ओरबाडले. या घटनांनंतर पोलिसांना काही ठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही फुटेज व फिर्यादी महिलांनी वर्णन केल्यानुसार हे एकाच टोळीचे कृत्य असल्याचा संशय आहे. चोरटे पसार झाल्यानंतर पोलिसांची वाहने त्यांचा शोध घेत होती. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

---------------

चोरटे दागिने लुटताहेत...पोलीस फलक लावताहेत

वाढत्या सोनसाखळी चोरीच्या पार्श्‍वभूमीवर तोफखाना पोलिसांनी सावेडी परिसरात प्रबोधनात्मक फलक लावले आहेत. घराबाहेर पडताना व गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांनी काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नये, गळ्यातील दागिने स्कार्प व ओढणीने झाकून घ्यावेत, आदी सूचना या फलकांवर देण्यात आल्या आहेत. महिला मात्र किती दिवस अशी काळजी घेणार. यासाठी आता पोलिसांनीच सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

----------------

गुन्हे प्रकटीकरण शाखा काय करते ?

तोफखाना आणि कोतवाली हद्दीत चेन स्नॅचिंग, इतर चोऱ्या व घरफोड्यांचे मोठे प्रमाण वाढले आहे. सर्वाधिक जास्त घटना या सावेडी उपनगरात होत आहेत. सराईत चोरटे चोरी करून निघून जातात. पोलीस स्टेशनची गुन्हे प्रगटीकरण शाखा काय काम करते. या शाखेतील कर्मचारी दुसऱ्याच कामात व्यस्त असतात. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त कसा होणार असाही प्रश्न आहे.

---------------------

महिलांचे दागिने चोरीच्या घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे, तसेच नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. दागिने ओरबाडणाऱ्या चोरट्यांचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.

-सुनील गायकवाड, निरीक्षक तोफखाना पोलीस स्टेशन

फोटो १० चोरटे