अहमदनगर : १८२७ पासून सतत नावीन्याचा शोध घेत आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण दागिन्यांचे असंख्य प्रकार सादर करणारे चंदुकाका सराफ अँड सन्स यांनी ट्रेंडी डिझाईन्सचा सुरेख संगम असणाऱ्या आणि ‘ठुशी अशीच हवी’, हे घोषवाक्य सादर केलेल्या ठुशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक स्त्रीला हवी हवीशी वाटणाऱ्या डिझायनर ठुशींचे विविध प्रकार दालनात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोल्हापुरी दागिना म्हणून ओळख असलेली ठुशी आज संपूर्ण महाराष्ट्रात कुठल्याही समारंभात, उत्सवात आवडीने घातली जाते. चोकर नेकलेस शैलीमध्ये सोन्याचे मणी एकमेकांत जवळून गुंफून ठुशीची रचना केली जाते. चंदुकाका सराफ यांनी सादर केलेल्या ठुशी महोत्सवातील ठुशींचे खास कलेक्शन पारंपरिक डिझाईन्सला नावीन्याची सुरेख झालर देत तयार करण्यात आले आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या रंगीत स्टोन्सचा वापर करण्यात आला आहे. चंदुकाका सराफ यांचा ठुशी महोत्सव म्हणजे लाईटवेट आणि ट्रेंडी डिझाईन्सचा अप्रतिम नजराणा आहे. ठुशींबरोबर मॅचिंग कानातले दागिनेही उपलब्ध आहेत. चंदुकाका सराफ यांच्या सर्व शाखांमध्ये ठुशी महोत्सव २६ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. फॉर्मिंग ठुशीवर एमआरपी किमतीवर दहा टक्केपर्यंत सूट देण्यात आली आहे. देखणी साजेशी ठुशी आज समारंभाचा अविभाज्य भाग झाली आहे. चंदुकाका सराफ यांच्या सोन्याच्या ठुशी कलेक्शन बघण्यासाठी व खरेदी करण्यासाठी चंदुकाका सराफ यांच्या नजीकच्या दालनात येण्याचे आवाहन चंदुकाका सराफचे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी केले आहे. (वा. प्र.)
चंदुकाका सराफ अँड सन्सतर्फे ठुशी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST