शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत

By admin | Updated: July 27, 2014 01:09 IST

अहमदनगर : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची लक्षणे नाहीत. आधीच टंचाईची परिस्थिती असताना जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रासोबत उत्पादनही घटलेले आहे.

अहमदनगर : जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात पाऊस पडण्याची लक्षणे नाहीत. आधीच टंचाईची परिस्थिती असताना जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रासोबत उत्पादनही घटलेले आहे. त्याचा चाऱ्यासाठी सर्रास वापर होत असल्याने उपलब्ध उसापैकी २० टक्के ऊस संपलेला आहे. यामुळे यंदा साखर कारखानदारीसाठी हंगाम अडचणीचा ठरणार आहे.जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून ७९ लाख ३० मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन ऊसाचे गाळप केले होते. त्यावेळी खरिपाच्या सुरूवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चाऱ्याचा प्रश्न नव्हता, नवीन लागवड मोठ्या प्रमाणात झालेली होती. यंदा परिस्थिती विपरीत आहे. साधारण जानेवारी ते मार्च या काळात झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेली पाण्याच्या टंचाईचा फटाका उसाला बसला आहे. २५ जुलै अखेर जिल्ह्यात अवघा एक टक्का उसाची लागवड झालेली आहे.जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. सर्व उसाचे गाळप झाल्यास त्यातून ७९ लाख ३० हजार मेट्रीक टन गाळप होईल, असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यात चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ५ लाख लहान तर १० लाख ६२ हजार मोठी जनावरे आहेत. या जनावरांना चाऱ्यासाठी उसाशिवाय अन्य कोणताच पर्याय शिल्लक नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात उसाचा वापर चाऱ्यासाठी होत आहे. तर काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस जळून जाण्यापेक्षा त्याचा चाऱ्यासाठी विक्री होताना दिसत आहे. बाजारात साधारण दोन हजारांपासून तीन हजार रुपये मेट्रीक टनाने उसाची विक्री होताना दिसत आहे. (प्रतिनिधी)कारखानेनिहाय उसाचे क्षेत्र हेक्टरमध्ये अगस्ती २ हजार ९१०, अशोक ६ हजार ९२०, डॉ. तनपुरे ५ हजार ५५०, डॉ. विखे ५ हजार ६५०, श्री ज्ञानेश्वर ११ हजार ४६०, श्री गणेश २ हजार ४२५, केदारेश्वर १ हजार २५, कर्मवीर शंकरराव काळे ४ हजार ४७०, कुकडी ५ हजार ९७२, मुळा १० हजार ३२५, संगमनेर ६ हजार २००, संजीवनी ५ हजार ५६५, श्रीगोंदा ११ हजार ४१४, श्री वृध्देश्वर ४ हजार ६५५, पारनेर ८००, नगर २००, गंगामाई ८ हजार ८८०, श्री अंबालिका ८ हजार ७९०, जय श्रीराम २८५, प्रसाद ३ हजार ७५५, साईकृपा २ हजार ५६४, साईकृपा हिरडगाव १२ हजार १३५.पावसाळा लांबल्यास जिल्ह्यात असणाऱ्या उसाचा चाऱ्यासाठी वापर होणार आहे. सध्या उपलब्ध उसापैकी १५ ते २० टक्के चाऱ्यासाठी वापरला जात आहे. मात्र, महिनाभर पावसाळा लांबल्यास ही टक्केवारी वाढणार आहे. याचा थेट फटका गळीत हंगामावर होणार आहे. नवीन लागवडीचा फारसा परिणाम हंगामावर होणार नाही.आगामी गळीत हंगामाच्या नियोजनासाठी उपलब्ध ऊस व उत्पादकता अंदाज करण्यासाठी पुणे येथे नुकतीच साखर आयुक्तांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला कृषी विभाागाचे अधिकारी, साखर कारखान्यांचे मुख्य शेतकी अधिकारी उपस्थित होते. यावेळी हंगामाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा पावसाअभावी ऊसाच्या क्षेत्रात बदल होणार नसला तरी त्याचा उत्पादकतेवर परिणाम होणार आहे. - मिलिंद भालेराव, सहसंचालक साखर