शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुळा डाव्या कालव्यात ऊसाचा ट्रक पलटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 17:53 IST

परवाणगी नसतांनाही मुळा डाव्या कालव्यावरून ऊस वाहतूक करणारा संगमनेर साखर कारखान्याचा ट्रक कालव्यात कोसळला़

राहुरी : परवाणगी नसतांनाही मुळा डाव्या कालव्यावरून ऊस वाहतूक करणारा संगमनेर साखर कारखान्याचा ट्रक कालव्यात कोसळला़ त्यामुळे कालवा बंद करण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आली़ नगरसेवक शहाजी जाधव यांच्या मालकीचा ऊस आहे़ ट्रक जाधव यांच्या पुतण्याची असून विद्युत तारीवरती करून जीवघेणी कसरत करीत ऊस वहातुक सुरू होती़ कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे़बुधवारी येवले आखाडा येथील शहाजी जाधव यांच्या क्षेत्रातील ऊस मुळा डाव्या कालव्याच्या रस्त्यावरून जात होता़ कालव्याला पाणी सुरू होते़ पाण्यामुळे कालवा खचला असतांना ट्रकचे पुढील चाक खचले़ त्यामुळे अचानक ट्रक पलटी झाला़ ट्रक पलटी झाल्यानंतर पाटबंधारे खात्याची त्रेधा त्रिरपट उडाली़ ३०० क्युसेकसने पाण्याचे अवर्तन सुरू होते़ टप्प्याटप्याने पाणी अवर्तन कमी करण्यात आले़ त्यामुळे कालवा फुटण्याचा धोका टळला़पाटबंधारे खात्याचे आधिकारी व कर्मचा-यांनी वरिष्ठांशी तातडीने संपर्क केला़ सहाय्यक कार्यकारी अभियंता योगेश देशमुख यांच्याकडे तक्रार आल्यानंतर कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधण्यात आला़ त्यानंतर देशमुख यांनी कालवा टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे आदेश दिले़ त्यानंतर कालव्याचे अवर्तन शुन्य करण्याच्या हालचाली झाल्या़ कालव्याच्या वरील बाजुला पाणी वळविण्याचे नियोजन सायंकाळपर्यंत सुरू होते़ मुळा चारीव्दारे पाणी देवळालीकडे वळविण्यात आले आहे़घटनेनंतर क्रेनच्या चालकाने मुळा डाव्या कालव्यात पडलेल्या ऊसाच्या ट्रकची पहाणी केली़ कालव्याला पाणी शु्न्य झाल्यानंतर ट्रक कॅनच्या माध्यामतून रात्री बाहेर काढण्यात येणार आहे़ ऊस ट्रकचा चालक गुलाब पवार हा सुदैवाने बालंबाल बचावला आहे़ ट्रकचा मालक श्रीकांत जाधव हे कालवा क्रॉस करून जाणा-या तारा वरती करीत असल्याचे पाटबंधारे खात्याने लोकतशी बोलतांना सांगितले़ घटनास्थळी पाटबंधारे खात्याचे आधिकारी तळ ठोकून आहे़ मुळा डाव्या कालव्यात ऊसाचा ट्रक पलटी होण्याची ही पहीलीच घटना आहे़कालव्याचे अवर्तन कमी करण्यात आले असून वरील बाजुने पाणी देवळालीकडे वळविण्यात आले आहे़ आज रात्री ऊसाचा ट्रक कालव्याच्या बाहेर काढण्यात येणार आहे़ संबंधीतांविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे़ -विकास गायकवाड, उपअभियंता

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी