शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

वीज बंद, पाणी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 15:00 IST

विजेचे बिल थकविल्याने महावितरणने श्रीरामपूर नगरपालिकेच्या काही कूपनलिकांचा (बोअर) वीज पुरवठा खंडित केला. वीजबिल थकबाकीमुळे वीज खंडित होण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

ठळक मुद्देश्रीरामपूर पालिका थकबाकीमुळे कूपनलिकांची वीज खंडित
श्रीरामपूर : विजेचे बिल थकविल्याने महावितरणने श्रीरामपूर नगरपालिकेच्या काही कूपनलिकांचा (बोअर) वीज पुरवठा खंडित केला. वीजबिल थकबाकीमुळे वीज खंडित होण्याची ही पालिकेच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी तत्कालिन आमदार जयंत ससाणे यांनी दूरदृष्टी ठेऊन आपल्या आमदार निधीतून प्रत्येक प्रभागात दोन दोन अशा सुमारे ७० कूपनलिका बसविल्या. त्यावर पालिकेच्या खर्चाने वीज मोटारी बसवून जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांना दिलासा दिला. यामुळे पाण्याची अडचण दूर होऊन नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पिण्याच्या पाण्यावर ताण पडू नये व चांगल्या पाण्याची नासाडी होऊ नये, अशा हेतूने या विंधन विहिरी घेऊन ससाणे यांनी नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिली होती. गेल्या १५ वर्षांपासून या कूपनलिकांवरून नागरिकांना सातत्याने पाणीपुरवठा होत होता. गेल्या ८ दिवसांपासून पाणी येणे बंद झाल्याने नागरिकांनी पालिकेकडे विचारणा केली असता पालिकेने वीज बिल थकविल्याने वीज खंडित झाल्याची बाब पुढे आली. पालिका कूपनलिकांसाठी नागरिकांकडून स्वतंत्र पाणीपट्टी आकारीत आहे. अचानक पाणी येणे बंद झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांचे नळजोड पालिकेने खंडित करावे किंवा करू नये हा त्यांचा अधिकार आहे मात्र ज्या नागरिकांनी यासाठी अगोदर पाणीपट्टी भरली आहे किमान त्यांची तरी गैरसोय करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे. मोठे गरीब कुटूंब असणाºयांसाठी कूपनलिकांचे पाणी नागरिकांच्या गरजा भागवित होते. आता त्यांच्यापुढे संकट उभे ठाकले आहे. सकाळी नळाला येणारे पाणी मोठमोठ्या कुटुंबासाठी पुरेसे पडत नाही तर पाणी साठविण्यासाठी व्यवस्था नसलेल्या गरीब कुटुंबावर आता बाहेरचे पाणी विकत घेऊन आपली गरज भागविण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या या अनास्थेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.