तालुक्यातील हिवरगाव पठार, शेंडेवाडी व परिसरात मागील दोन दिवसापासून शेती पंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे. वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा अन्यथा दोन दिवसानंतर साकुर येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शेती मालाच्या होणाऱ्या नुकसानीस महावितरण जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी गजानन खाडे, भाऊसाहेब उगले, संतोष डोळझाके, जनार्दन नागरे, असीफ शेख, सुनील डोळझाके, देविदास नागरे, सोपान डोळझाके, पांडुरंग वामन, शिवाजी वामन, रावसाहेब वामन, नजीर सय्यद, अशोक डोळझाके, अशोक वामन, भरत वनवे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. दुरुस्तीचे काम सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे साकुर महावितरणचे सहाय्यक अभियंता समाधान घुगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
फोटो -घारगाव
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी साकुर महावितरणाला निवेदन देताना शेतकरी