याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण १५ जणांविरोधात पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून, दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मंगल बाबासाहेब पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिल पोपट पालवे, गणेश पोपट पालवे, पोपट दत्तू पालवे, राजेंद्र दत्तू पालवे, प्रकाश दादाबा पालवे, रोहित राजेंद्र पालवे व सीमा गणेश पालवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच घटनेप्रकरणी सीमा गणेश पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत ऊर्फ दाद्या बाळासाहेब सानप, परमेश्वर ऊर्फ भमड्या बाबासाहेब पालवे, बाबासाहेब मोहन पालवे, धनेश्वर बाबासाहेब पालवे, मंखाबाई बाबासाहेब पालवे, बाळासाहेब गंगाधर सानप, कचरू शहादेव घुले, नवनाथ गहिनीनाथ घुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जारवाल पुढील तपास करीत आहेत.
मटनावरून दोन गटांत तुफान राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST