शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

अभियंत्याला घातला बंद ट्युबलाईटचा हार

By admin | Updated: September 20, 2015 00:50 IST

अहमदनगर: तोफखाना, दिल्लीगेट परिसरातील प्रभाग १७ मधील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करुनही ते सुरू झाले नाहीत.

अहमदनगर: तोफखाना, दिल्लीगेट परिसरातील प्रभाग १७ मधील बंद पडलेले पथदिवे सुरू करण्यासाठी पाठपुरावा करुनही ते सुरू झाले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेले नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी विद्युत विभागातील अभियंत्यास बंद पडलेल्या ट्युब लाईटचा हार घातला. अनोख्या पध्दतीचे गांधीगिरी आंदोलन करताच ट्युबलाईट सुरू करण्यासाठी तातडीने मनपाचे वायरमन प्रभागात साहित्यासह रवाना झाले. सतरा नंबर प्रभागात मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी सुविधांचा आभाव आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करुनही प्रभागातील कामे होत नाहीत. सर्वाधिक विद्युत विभागाच्या तक्रारींचा समावेश आहे. विद्युत अभियंता बाळासाहेब सावळे यांना वारंवार निवेदन देऊनही प्रभागातील बंद पडलेले पथदिवे, हायमास्ट सुरु न झाल्याच्या निषेधार्थ शनिवारी नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी प्रभागातील बंद पडलेल्या पथदिव्यांच्या ट्युब व चोक यांचा हार करुन अभियंता सावळे यांना घालून अनोखे गांधीगिरी आंदोलन केले, तसेच अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. गणेशोत्सव काळात प्रभागात अंधार आहे. काही भागात रात्री आठनंतर पथदिवे सुरू होतात. साहित्य व कर्मचारी नसल्याचे कारण देत विद्युत अभियंता बाळासाहेब सावळे हे निष्क्रीयपणा करत असल्याचा आरोप करत त्यांचा निषेध म्हणून प्रभागातील पथदिव्यांच्या गेलेल्या ट्युब व चोक यांचा हार घालून त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल सत्कार करण्यात येत असल्याचे छिंदम यांनी यावेळी सांगितले. तसेच प्रभागात मोकाट कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून तक्रार करूनही मोकाट कुत्रे पडकले जात नाहीत. मनपा प्रशासनाने दोन दिवसांच्या आत मोकाट कुत्र्यांवर कारवाई केली नाही, तर हे मोकाट कुत्रे पकडून आयुक्तांच्या दालनात सोडण्याचा इशारा यावेळी नगरसेवक छिंदम यांनी दिला.आंदोलन सुरू असतानाच अतिरिक्त आयुक्त वालगुडे यांनी विद्युत विभागाचे प्रभारी अभियंता आर. जी. सातपुते यांना तत्काळ बोलावून तातडीने उपाययोजना करण्याचा सूचना दिल्या. निष्क्रीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. सातपुते यांनी तत्काळ विद्युत विभागाच्या वायरमनला साहित्य घेऊन प्रभागात रवाना केले. आंदोलनात महेश सब्बन, विजय सामलेटी, अभिजित चिप्पा, अमोल बोल्ली, नंदकिशोर शिरापुरी, सागर बल्लाळ, संदीप बोडखे, संतोष ठाकूर, अमृत वन्नम, कुणाल गोसके, सनी कारंपुरे आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)