आॅनलाईन लोकमतपारनेर (अहमदनगर), दि़ ६- पारनेर तालुक्यातील डिकसळ येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभागासह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले़ अखेर तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले़डिकसळ येथे गुरुवारी सकाळी एका विहिरीत बिबट्या पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले़ अन्नाच्या शोथार्थ हा बिबट्या मानवी वस्तीनजिक आला होता़ मात्र, विहिर लक्षात न आल्यामुळे तो विहिरीत पडला असावा, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ या परिसरात नेहमीच बिबट्याचे वास्तव्य असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले़ मागील काही दिवसापूर्वी गोरेगाव-डिकसळ सिमेवरही बिबट्याने धुमाकूळ घातला होता़ त्यामुळे या परिसरात दोन किंवा अधिक बिबट्यांचा संचार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ बिबट्या विहिरीत आढळून आल्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला दूरध्वनीवरुन माहिती दिली़ वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले़ तोपर्यंत बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़ या गर्दीला बाजूला करीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला बाहेर काढले़
बिबट्याला विहिरीतून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
By admin | Updated: April 6, 2017 15:43 IST