शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राशीनमध्ये बँक फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 16:50 IST

राशीन येथील एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी केलेला हा प्रयत्न फसला.

राशीन : येथील एकमेव राष्ट्रीयकृत युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरट्यांनी केलेला हा प्रयत्न फसला.राशीनमधील कर्जत-बारामती महामार्गावर युनियन बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी ही शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. चोरट्यांनी बँकेचे शटर व लोखंडी दरवाजा टणक वस्तुने उचकटून बँकेच्या आत प्रवेश करण्यात यश मिळविले. परंतु तिजोरीपर्यंत जाता न आल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.या घटनेची माहिती मिळताच राशीन पोलीस दूरक्षेत्राचे फौजदार वैभव महांगरे, पोलीस काँस्टेबल, तुळशीदास सातपुते, गणेश ठोंबरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. बँकेच्या शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता फडक्याने चेहरा गुंडाळलेले दोन चोरटे चोरीचा प्रयत्न करताना दिसून आले.रविवार असल्याने बँक बंद होती. सोमवारी बँकेची शाखा नियमित कामकाजासाठी उघडण्याअगोदर ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस मुख्यालयातील अंगुलीमुद्रा शाखेचे ठसे तज्ज्ञ ए. एस. भिसे, पोलीस कॉँस्टेबल अशोक गुंजाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. चोरट्यांचा कोणताही माग पोलिसांना सापडला नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर