शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दावणीला चारा देण्यासाठी प्रयत्न करू : परिवहन मंत्री दिवाकर रावते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 19:11 IST

दुष्कााळाची तीव्रता वाढली आणि आचारसंहिता लागली यामुळे दुष्काळात होरपळणा-या शेतक-्यांच्या मदतीला येता आले नाही हे आमच्या राज्यकर्त्याचे दुदैव आहे

केडगाव : दुष्कााळाची तीव्रता वाढली आणि आचारसंहिता लागली यामुळे दुष्काळात होरपळणा-या शेतक-्यांच्या मदतीला येता आले नाही हे आमच्या राज्यकर्त्याचे दुदैव आहे. पाऊस लांबला तर शेतक-यांच्या दावणीला चारा देण्याबाबत विधानसभेत प्रस्ताव मांडू असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले.रावते यांच्या हस्ते नगर तालुक्यातील अकोळनेर, खंडाळा येथील छावणीतील शेतक-यांना गहू, तांदूळ व डाळीचे वाटप करण्यात आले. रावते यांनी अकोळनेर येथील जनावरांच्या छावणीस भेट दिली. यावेळी राज्य विधानसभा उपाध्यक्ष विजयराव औटी, माजी राज्यमंत्री अनिल राठोड, संदेश कार्ले, रामदास भोर, तहसीलदार रोहिणी न-हे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनिल तुंबारे, प्रभारी गट विकास अधिकारी वसंतराव गारुडकर उपस्थित होते.रावते म्हणाले, दुष्काळ हा खरीप हंगाम संपल्यानंतर म्हणजेच आॅक्टोबर महिन्यात दुष्काळाबाबत संबंधीत यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. पहिल्या जनावरांच्या छावण्या लवकर सुरु झाल्या आहेत. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाण्यावर नगर, मराठवाडा अवलंबून असतो. यावेळी नाशिक जिल्हयात कमी पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. छावणीतील जनावरांच्या चारा रक्कमेत वाढ करण्यात आली व टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. आचारसंहिता संपल्यावर छावणतील जनवारांसाठी मुक्कामास असलेल्या शेतक-यांना मदत म्हणून गहू 10 किलो, तांदूळ 5 किलो व डाळ 1 किलो धान्याचे वाटप यावेळी करण्यात आले. तसेच अकोळनेर व खंडाळा येथील शेतकरी व महिलांशी रावते यांनी संवाद साधला.या कार्यक्रमास अकोळनेर व खंडाळा छावणीतील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय