शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वस्त मंडळ सरकारच्या की भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी?

By admin | Updated: August 12, 2016 23:57 IST

प्रमोद आहेर, शिर्डी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़

प्रमोद आहेर, शिर्डीशताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़ भाविकांच्या श्रद्धेचा उपयोग सामाजिक कामासाठीच व्हायला हवा, मात्र त्यांच्या श्रद्धेचा आदर ठेवून अशी सर्वसामान्याची अपेक्षा आहे़शासनाला वैद्यकीय कामांसाठी निधी देण्यापेक्षा सार्इंचा वारसा चालवणारा रूग्णसेवेचा आणखी विस्तार करून मेडिकल, नर्सिंग महाविद्यालये, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करणेही सरकारला मदत केल्यासारखेच आहे़पाचशेवर खाटा असलेल्या संस्थान रूग्णालयाची कितीही अबाळ झाली असली तरी जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भ, मराठवाड्यातील गोरगरीब रूग्णांसाठी हा हक्काचा आधार आहे़ गेल्या वर्षी संस्थान रूग्णालयात ४ लाख ४६ हजार रूग्णांवर उपचार झाले, पंचवीस हजार रूग्ण अ‍ॅडमीट झाले, २० हजार ४४२ रूग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या़ सुपरस्पेशालीटीच्या रूपाने कार्डीयाक व न्युरो विभागात गेल्या दहा वर्षात एक लाखाहून अधिक रूग्णांवर माफक दरात उपचार झाले़ रूग्णालयावर गेल्या वर्षी संस्थानने ९१ कोटी रूपये खर्च केले़ अन्य ठिकाणी उपचार घेणाऱ्या ४७,६५५ गरीब रूग्णांना ७ कोटी ३१ लाखांची वैद्यकीय मदत केली़संस्थानच्या २ हजार ८७१ खोल्या, हॉलचा वर्षभरात ५९ लाख २४ हजार तर प्रसादालयात १ कोटी ३० लाख भाविकांनी लाभ घेतला़ वर्षभरात तीन कोटीहून अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या पंचवीस टक्के इतकी ही संख्या व त्यांच्या सुविधा, भावना दुर्लक्षित करता येणार नाहीत़दर्शन सुविधेचा वाईट अनुभव आलेल्या सुरेश हावरे यांनी तीन वर्षापूर्वी शिर्डीला पुन्हा न येण्याचा निर्धार केला होता. अन्य भाविकांची अशा कटू अनुभवातून सुटका व्हावी, याकरताच कदाचित त्यांना साईकृपेने अध्यक्ष पदाची संधी मिळाली असेल़ त्यांनी आता भाविकांचे दर्शन व वास्तव्य कसे आनंददायी होईल यावर लक्ष द्यायला हवे़उन्हाळ्यात पाण्याअभावी भक्तनिवास बंद ठेवले, भाविक पत्रावळीवर जेवले, दर्शनरांगेत उन्हातान्हात भाविक लेकराबाळांना घेऊन उभा असतो, मान्यतेअभावी मंदिर परिसरातील फरशी बदलता येत नाही, शहरातील रस्ते अर्धवट आहेत, स्वच्छतागृहे नाहीत, अनेक प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत याबाबत संस्थानकडे पैसे मागणारांना काही करावसं वाटत नाही़ (समाप्त)संस्थान रूग्णालय गोरगरिबांसाठी वरदान आहे, ते अद्ययावत करायचे सोडून सरकारला आरोग्यासाठी निधी देणे दुर्दैव आहे, शिर्डी ग्रामस्थांचा याला विरोध असेल, याबाबत व्यवस्थापनाला जाब विचारू़ -कैलास कोते, माजी नगराध्यक्ष, माजी विश्वस्त़सरकार भक्तांचा पैसा लुटण्याच्या प्रयत्नात आहे़ सरकारने जनतेच्या कामांसाठी शासकीय पैसा वापरावा, भक्तांच्या पैशाची आम्ही लूट करू देणार नाही़-दत्तात्रय कोते, मनसे जिल्हाध्यक्ष़