शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चास शिवारात गळ्याला चाकू लावून ट्रकचालकाला लुटले; महामार्गावर लुटारूंचा धुमाकूळ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:59 IST

मंगळवारी मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील चास शिवारात तिघांनी ट्रकचालकाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल लुटला.

अहमदनगर : शहरातून जाणा-या महामार्गावर वाहनचालकांना अडवून लुटमारीच्या घटना वाढल्याने रात्रीचा प्रवास धोकादायक बनला आहे. मंगळवारी मध्यरात्री नगर-पुणे रोडवरील चास शिवारात तिघांनी ट्रकचालकाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रकमेसह मोबाईल लुटला.नगर शहर व तालुका हद्दीत गेल्या महिनाभरात दहा वाहनचालकांना लुटण्याच्या घटना समोर आल्या आहेत. ट्रकचालक उदयभान सुखलाल पटेल (वय २३ रा. अलाहाबाद, उत्तरप्रदेश) याने चास शिवारातील पेट्रोल पंपाजवळील हॉटेलमधील पार्किंगमध्ये ट्रक पार्क केली होती. पटेल ट्रकच्या केबिनमध्ये झोपला होता. मंगळवारी रात्री तिघांनी पटेल याच्या गळ्याला चाकू लावून त्याला मारहाण केली. तसेच त्याच्याकडील रोख १२ हजार ८०० रूपये व एक मोबाईल चोरून नेला़ या घटनेनंतर पटेल याने नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे़१५ जानेवारी रोजी बजरंगवाडी (ता. शिक्रापूर जि़. पुणे) येथील मुजमिल हुजूर देशमुख या ट्रकचालकालाही पांढरीपुलाजवळील पेट्रोलपंपावर तिघांनी अशाच पद्धतीने गळ्याला चाकू लावून लुटले होते. यावेळी ३९ हजार ८०० रूपये लंपास केले. पंधरा दिवसांपूर्वी शेंडीबायपास येथे दोघांनी ट्रकचालकाला मारहाण करून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने दोघा चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर कल्याण रोडवर एका ट्रकचालकाला चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील सहा हजार रूपये व मोबाईल लंपास केला. २० दिवसांपूर्वी बु-हाणनगर परिसरात टेम्पोचालकाला मारहाण करून त्यांचा टेम्पो चोरून नेला होता. महिनाभरात अशा दहा घटना घडल्या आहेत.

एका आरोपीला अटक

चास शिवारात ट्रकचालकाला लुटणा-या तिघांपैकी नगर तालुका पोलीसांनी संतोष रणदिवे (रा. केडगाव) याला अटक केली आहे. या टोळीतील मुख्य आरोपी नितीन पवार हा मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस