शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एटीएम कार्ड क्लोन करणा-या टोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 16:13 IST

आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना आता एटीएम क्लोन करून चोरट्यांनी बँक ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे़

अरुण वाघमोडेअहमदनगर : आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचे प्रमाण वाढत असताना आता एटीएम क्लोन करून चोरट्यांनी बँक ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारण्यास सुरूवात केली आहे़ जिल्ह्यातील राहाता, राहुरी व संगमनेर शहरात गेल्या आठ दिवसांत दहा जणांची अशा पद्धतीने फसवणूक झाल्याचे समोर आले आहे़फसवणूक झालेल्या नागरिकांनी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे़ एटीएम मशीनमध्ये स्किमर लावून अशी स्मार्ट चोरी करणाऱ्या टोळ्या या परराज्यातील असल्याचे सायबर पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे़ राहुरी येथील सहा, राहाता दोन तर संगमनेर येथील दोन ग्राहकांचे एटीएम क्लोन करून त्यांच्या खात्यातून चोरट्यांनी पैसे काढले आहेत़ सर्व ग्राहकांची मिळून सहा ते सात लाख रुपयांची ही रक्कम आहे़ विशेष म्हणजे या बँक ग्राहकांचे एटीएम क्लोन केल्यानंतर चोरट्यांनी बनावट एटीएम तयार करून त्यांच्या खात्यातून दिल्ली, नोयडा, सिल्वासा येथील एटीएममधून पैसे काढले आहेत़पैसे घरात ठेवले तर चोरीची भीती, खिशात ठेवले तर खिसेकापूंची भीती त्यामुळे नागरिकांनी एटीएम कार्डचा वापर करणे सुरू केले आहे़ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एटीएम कार्डाचाच डेटा चोरी करण्याची पद्धत चोरट्यांनी वापरण्यास सुरुवात केल्याने आता एटीएममधून पैसे काढणेही धोक्याचे ठरू लागले आहे़चोरटे एटीएम रुममध्ये हिडन (न दिसणारा) कॅमेरा लावतात़ ग्राहक एटीएममध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतरप्रथम मशीनमध्ये कार्ड टाकतो त्यानंतर पीन क्रमांक प्रेस केला जातो़या दोन्ही प्रक्रिया चोरट्यांच्या कॅमेºयात कैद होतात़एटीएम मशीनवर पीन क्रमांकप्रेस करण्याचा जो कि बोर्ड असतो त्याच्यासमोर चोरटे एक पॅड (स्किमर) लावतात़ त्याला छोटा कॅमेरा बसविलेला असतो़ या कॅमेºयात एटीएमचा पीन स्कॅन होतो़एटीएम मशीनमध्ये कार्ड टाकण्याच्या ठिकाणी चोरटे स्किमर बसवितात़ कार्ड टाकल्यानंतर हे कार्ड पूर्ण क्लोन होते़ एटीएम कार्डाचा डेटा हातात आल्यानंतर चोरटे बनावट एटीएम कार्ड तयार करून घेतात़ चोरलेल्या पासवर्डचा वापर करून देशभरातील कुठल्याही एटीएम मशीनमधून चोरटे ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढून घेतात़ राहुरी, राहाता आणि संगमनेर येथे याच पद्धतीने एटीएम कार्ड क्लोन करून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे़नागरिकांनी एटीएममधून पैसे काढताना आपला पीन क्रमांक कुणाला दिसणार नाही याची दक्षता घ्यावी़ त्या एटीएम मशीनला कुठे स्किमर लावलेले आहे का? याची खात्री करावी, अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले एटीएम कार्ड देऊ नये, फसवणूक झाली तर तत्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा़ -प्रतीक कोळी, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस