केडगाव : अनंत चतुर्दशीच्या दिवशी केडगावातील महापालिकेच्या विसर्जन कुंडात गणपती विसर्जन करणाऱ्या गणेश मंडळांना व गणेश भक्तांना केडगाव जागरूक नागरिक मंचच्या व सामाजिक वनीकरण विभाग यांच्या वतीने वृक्षभेट देण्यात आले. प्रत्येक कुंडावर हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, मंचचे खजिनदार प्रवीण पाटसकर, पोलीस नाईक भेटे, टिपरे, दानी, खोकले, बोरुडे, शिंदे. पोलीस हेडकॉन्स्टेबल सातपुते, पवार, होमगार्ड दीपक सातपुते, वैभव लोखंडे, सुनील नांगरे, मंदार सटाणकर, मनपाचे मुकादम बाबासाहेब जाधव, विजय कोतकर, अशोक गुंड, प्रकाश साठे, मनपा कर्मचारी लखन शिंदे, भरत कांबळे, बाळू बोडके, जालिंदर बोरगे, सोनू बारसे, संतोष बुलाखे, सर्जेराव पवार, बाळू शिंदे, श्रीहरी बुलाखे, अरुण धोत्रे, राजू मेढे, कुणाल नरवाला, सतीश कांबळे, आकाश साळवे, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.
केडगाव येथे वृक्षभेट उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:22 IST