कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील राहुलदादा टेके पाटील चाॅरिटेबल ट्रस्ट, मित्र फाउंडेशन, कोपरगाव व रामेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ( दि.१९) प्रशासकीय अधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वड, कडूलिंब, चिंच, भेंडी, गुलमोहराचे वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपणासाठी पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अजय थोरे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली बडदे, बालविकास अधिकारी पंडित वाघेरे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दिनेश चावडा, पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, वारी दूरक्षेत्राचे पोलीस अधिकारी राजेंद्र म्हस्के, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, विस्तार अधिकारी दहिफळे, केंद्र प्रमुख किशोर निळे, वारी वीज उपकेंद्राचे अभियंता सुनील गाडेकर, मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव आढाव, माजी सभापती मच्छिंद्र टेके, मुख्याध्यापक छबू पाळंदे, मुख्याध्यापक सुखदेव कराळे, माजी संचालक मधुकर टेके, सुदाम टेके, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके यांच्यासह वारीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पारखे, ग्रामविकास अधिकारी दिलीप वारकर, वारीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवाजी बाचकर, जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विजय काकडे, ग्रामपंचायत सदस्य विजय गायकवाड, प्रकाश गोर्डे, अनिल गोरे, सुवर्णा गजभिव, नामदेव जाधव, नरेंद्र ललवाणी, विजय ठाणगे, विकास शिंदे, बाबासाहेब शिंदे, ‘लोकमत’ चे उपसंपादक रोहित टेके, पत्रकार फकीर टेके, बच्चू गायकवाड, गौतम डोशी, नवनाथ कवडे, दत्तात्रय चव्हाण, अशोक गजभिव, अशोक बोर्डे, सुनील बाविस्कर, हिरालाल गायकवाड, भास्करराव आदमने, पंडित वीर, संदीप जाधव, दौलत जाधव, चंद्रकांत पाटील, वाल्मीक कर्डिले, सर्जेराव टेके उपस्थित होते.
वृक्षारोपणासाठी बाळासाहेब तुपे, कैलास शेळके, रवींद्र रासकर, वसंत जाधव, चंद्रकांत जोर्वेकर, राजू गावित, तुकाराम जेठे, नारायण सूकटे, दत्तू सांगळे, नितीन निकम, गोरख सोनवणे, सुरेश सोनवणे, सुरेश जमधडे, विजय निळे, रघुनाथ आहेर, अशोक निळे, अजीम शेख, सुरज टेके, स्वप्नील टेके, बिपीन टेके, पुरुषोत्तम टेके, आकाश टेके, साईराज टेके, अनुराग टेके आदींनी परिश्रम घेतले.