नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील विहिरी यावर्षी काठोकाठ भरल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा, कांदे यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. पिंपळगाव-वडगाव हद्दीवर असलेल्या पठाणवस्ती येथील ट्रान्सफॉर्मर तीन महिन्यांपूर्वी जळाला आहे. परंतु महावितरणने अद्याप बदलून दिला नाही. त्यामुळे या परिसरातील पन्नास शेतकऱ्यांची उभी पिके जळाली आहेत. यावर्षी विहिरींना पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नगदी पिके संत्रा, कोबी, फ्लॉवर अशी पिके घेतली हाेती. काही शेतकऱ्यांनी जनरेटर आणून पिके वाचवली, परंतु सर्वात शेतकऱ्यांना खर्च परवडत नाही. पाणी असून महावितरणमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या परिसरातील शेतकरी शिवाजी शेवाळे, हरिभाऊ झिने, नंदू साबळे, भाऊराव झिने, नवनाथ गुडगळ, शंकर कारंडे यांनी महावितरणने ट्रान्सफार्मर बदलून देण्याची मागणी केली आहे.
...
फोटो-०५पिंपळगाव माळवी
...
ओळ : महावितरणच्या मनमानीमुळे नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी परिसरात पाण्याअभावी जळालेले गव्हाचे पीक.