शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

रात्री १२ पर्यंत चालल्या शिक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 16, 2016 00:07 IST

अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत.

अहमदनगर : शुक्रवारपासून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसांत रखडत रखडत मुख्याध्यापक आणि उपाध्यापक संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत ४११ शिक्षकांच्या पेसा, समानीकरण आणि विनंती बदल्या झाल्या आहेत. अवघ्या आठ दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी डोळ्यात तेल घालत, बदल्यांच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करत कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया राबवत आहेत. सर्वांत मोठा विभाग असणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागाची बदली प्रक्रिया किचकट प्रक्रियेमुळे वेळखाऊपणाची झाली. यात काही तालुक्यांनी परिपूर्ण माहिती सादर न केल्याने काही प्रकारातील बदल्या स्थगित ठेवण्यात आल्या. शनिवारी दिवसभर आणि रात्री १२ पर्यंत पेसामधून ५६ शिक्षकांना बाहेर काढण्यात आले. तर तेवढेच शिक्षक पुन्हा पेसात पाठवण्यात आले. ३४ शिक्षकांची समानीकरणात बदली करण्यात आली असून २६५ शिक्षकांनी आपसी बदलीचा फायदा घेतला. या बदल्यांची प्रक्रिया मोठी असल्याने त्यासाठी अधिक वेळ लागला. शनिवारी रात्रीच कोणत्याही परिस्थितीत बदल्या पूर्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे बदली पात्र शिक्षकांना १२ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेत थांबावे लागले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, सामान्य प्रशासन विभागाचे अशोक व्यवहारे, ऋषिकेश बोरूडे प्रक्रिया राबवत होते. रविवारी आरोग्य विभागाच्या स्थगिती दिलेल्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात आरोग्य सेवक पुरुष १४ पेसा, १३ समानीकरण, १ आपसी बदली, आरोग्य सेविका महिला १८ पेसा, १४ समानीकरण, १० आपसी बदल्या राबवण्यात आल्या. सुट्टी असताना जिल्हा परिषदेत गर्दी होती. (प्रतिनिधी)