शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तुर्तास टळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 14:35 IST

जिल्हाअंतर्गत बदल्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी (दि़ २५) जैसे थे (स्टेट्स को) ठेवण्याचा आदेश दिला,

अहमदनगर : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी (दि़ २५) जैसे थे (स्टेट्स को) ठेवण्याचा आदेश दिला, अशी माहिती अ‍ॅड़ राजेंद्र टेमकर यांनी ‘लोकमत’ला दिली़ या आदेशामुळे शिक्षकांच्या संभाव्य जिल्हांतर्गत बदल्या टळल्या आहेत़महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ रोजी जिल्हाअंतर्गत बदली धोरण फक्त शिक्षक संवर्गासाठीच जाहीर केले होते. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिक्षक राजेश जगताप व राजश्री राजेश जगताप व इतर २७ शिक्षकांनी औरंगाबाद खंडपीठात दोन स्वतंत्र याचिका दाखल करुन आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत जाचक अटी असल्यामुळे हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी केली होती़ या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुट्टीतील न्यायाधिश केक़े़ सोनवणे यांच्यासमोर सुनावणी झाली़ शिक्षकांच्या वतीने अ‍ॅड़ एस़ आऱ बारलिंगे, अ‍ॅड़ राजेंद्र टेमकर यांनी युक्तीवाद केला़ या दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधिश सोनवणे यांनी या याचिकांवर स्टेट्स को आदेश दिला असून त्यामुळे आंतरजिल्हा बदली नको असलेल्या शिक्षकांची बदली टळली आहे़राजश्री राजेश जगताप, राजेश जगताप, अंबादास गारुडकर, दत्ताभाऊ कुलट, भास्कर कराळे, संजय म्हस्के, पंढरीनाथ पाटील, बाळासाहेब कापसे, नारायण पिसे, शरद गिरवले, ईश्वर नागवडे, मच्छिंद्र लांडगे, नवनाथ वाळके, रोहिदास निमसे, राजाराम सरोदे, बबन शिंदे, शरद धलपे, संतोष साळे, राजू माने, बाळासाहेब डहाळे, महादेव नाईक, सोनवणे, महेश धामणे, अनिता शिंदे , रेखा पाटोळे, मनीषा डांगे आदींनी ही याचिका केली होती़