शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगाव कारागृहातील ७७ आरोपींची हर्सुल व नाशिकरोड जेलमध्ये रवानगी

By सचिन धर्मापुरीकर | Updated: August 20, 2023 19:43 IST

इमारत बांधण्यासाठी कारागृह केले रिकामे

कोपरगाव (जि. अहमदनगर) : कोपरगाव कारागृहातील कैद्यांची अतिरिक्त झालेली संख्या पाहता कारागृह प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार ७७ कैदींना संभाजीनगर येथील हर्सुल व नाशिक रोड कारागृहात हलविण्यात आले. शनिवारी व रविवारी अशी दोन टप्प्यात आरोपींची रवानगी करण्यात आली.

कोपरगाव येथील कारागृहाची वास्तू ही ७० वर्षापूर्वीची आहे. या कारागृहातील सर्व बराकींकींची अवस्था ही अत्यंत खराब झालेली आहे. त्याची दुरुस्ती ही मुदतीत होणे गरजेचे आहे. तात्पुर्त्या स्वरुपात कारागृहाची दुरुस्ती करून मिळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना दि. २० जानेवारी रोजी कळविण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पत्र देऊन दुरुस्तीच्या कामास मंजूरी प्राप्त करुन जेलची इमारत दुरुस्तीसाठी तीन महिन्याचा  कालावधी लागणार असून त्यासाठी जेलची इमारत रिकामी करुन ताब्यात मिळण्याची मागणी केली.  त्यानुसार जेलचे अधिक्षक तथा तहसिलदार संदिपकुमार भोसले यांनी दि. १५ जुलै २०२३ रोजी कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग येरवडा पुणे यांना जेलमधील सर्व ७७ आरोपींना अन्यत्र वर्ग करण्याची परवानगी मिळावी असा लेखी प्रस्ताव पाठविला होता.  पुणे विभागाचे डी. आय. जी. यांचेकडून दि. १४ ऑगस्ट रोजी मंजूरी आल्यानंतर तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी यांना पोलीस बंदोबस्त मिळण्याची मागणी केली. होती.कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रदिप देशमुख यांनी तातडीने अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयाकडून पोलीस व्हॅनची मागणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांनी ७७ आरोपींना घेऊन जाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी व ८० पोलीस कर्मचारी उपलब्ध करुन दिले.

कोपरगाव दुय्यम कारागृहात सध्या दाखल असलेल्या गंभीर गुन्हयांतील खून, लव्ह जिहाद प्रकरण, दरोडा, रस्तालूट, शिर्डीतील ठेवीदारांची फसवणूक केलेले सर्व आरोपी, बलात्कार, मुलींना फूस लावून पळवून नेणे, इ. गुन्ह्यातील पाच पोलीस स्टेशनच्या गुन्हयांतील ३७ आरोपींची सेंट्रल जेल, हर्सल छ. संभाजीनगर येथे दि. १९ रोजी तर २० ऑगस्ट रोजी नाशिक रोड येथील सेंट्रल जेलमध्ये अशा एकूण ७७ आरोपींची रवानगी पोलीस बंदोबस्तात करण्यात आली असल्याची माहिती तुरुंगाधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिली.