शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अहमदनगरचा जवान देतोय राजपथावरील संचलनाचे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:36 IST

२६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून संदीप तांबे यांची निवड झाली आहे.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : २६ जानेवारी रोजी आपण सर्वजण राजपथावर सैन्याचे गौरवास्पद संचलन पाहणार आहोत. राजपथावरील संचलन हे जवानांसह देशवासीयांसाठीही गौरवास्पद असते. या गौरवास्पद संचलनाची जवानांकडून खडतर सराव करवून घेतला जातो. जवानांकडून हा सराव करवून घेण्यासाठी महाराष्ट्रातून संदीप तांबे यांची निवड झाली आहे. संदीप तांबे हे पारनेर तालुक्यातील गोरेगावचे सुपूत्र असून, ते सशस्त्र सीमा दलात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत आहेत.२६ जानेवारी रोजी ६८ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. स्वातंत्र्यदिनी राजपथावर भारतीय सैन्याचे संचलन होते. सैन्याचे हे संचलन देशासाठी गौरवास्पद बाब असते. हा गौरवास्पद सोहळा साजरा करण्यासाठी दिल्लीत भारतीय जवानांच्या प्रशिक्षणाची धूम सुरू आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही हे प्रशिक्षण सुरू आहे. सशस्त्र सीमा दलाची १४४ जणांची तुकडी पहाटेपासून संचलनाचा सराव करीत आहे. या तुकडीला भोपाळ येथील सशस्त्र सीमा दलाच्या अकादमीतील प्रशिक्षक संदीप तांबे यांच्यासह १४ प्रशिक्षकांची टीम हे प्रशिक्षण देत आहेत.संदीप तांबे हे २००५ मध्ये सशस्त्र सीमा दलात भरती झाले़ २००७ मध्ये त्यांनी प्रशिक्षकपदाचा कोर्स केला आणि २०१२ पासून ते प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. संदीप तांबे हे सध्या भोपाळ येथील सशस्त्र सीमा दलात हेड काँस्टेबल पदावर कार्यरत आहेत. प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या संचलनाची तयारी करवून घेण्यासाठी तांबे सध्या दिल्लीत आहेत. संचलनाच्या तयारीसाठी निवडक प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यात संदीप तांबे यांची निवड झालेली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndian Armyभारतीय जवान