शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राशीनची येमाई देवी व महादेवांचा रंगला पारंपरिक विवाह सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 13:31 IST

राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला.

राशीन : राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान राशीनची जगदंबा (येमाई) देवी मंदिरात रविवारी रात्री तेलवण अष्टमीचा कार्यक्रम पारंपरिक पध्दतीने उत्साहात पार पडला. या सोहळ्यात येमाई देवी व महादेवाचा विवाह सोहळा चैत्र व मार्गशिर्ष या महिन्यातील दुर्गाष्टमीला हा विवाह सोहळा पारंपरिक पध्दतीने यंदाही सालाबादप्रमाणे रंगला.देवीला व महादेवांना गरम पाण्याने स्नान घातले जाते. हळकुंडाचे काकण बांधून देवीला व महादेवाला फुलांच्या मंडोळ्या घातल्या जातात. देवीची महावस्त्रलंकार पूजा बांधली जाते. दरम्यान संध्याकाळी गावातील महिला मंदिरात एकत्र येतात. देवीच्या धुपारतीच्यावेळेस मंध्यतरी देवीला तेलवणाचे गाणे म्हणत देवीला तेलवण लावले जाते. या तेलवण कार्यक्रमात देवी व महादेवाचा विवाह करण्याची पारंपरिक पध्दत आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानतंर पानाचे विडे महिलांना दिले जातात. देवीला तेलवण लावण्याची प्रमुख सेवा परिट समाजातील महिलेला आहे. हा दिमाखदार सोहळा पाहण्यासारखा असतो. यंदाही हा सोहळा पार पडल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

असे असते पारंपरिक तेलवण.....

देवीच्यापुढे चोळीच्या खणावर धान्याची रास घातली जाते. या रासीवर मध्यभागी तेलाचे भांडे ठेवतात असलेल्या वेताच्या काठीच्या टोकाला सुताच्या धाग्याच्या साह्याने नागिणीचे पान बांधले जाते. त्या काठीच्या पानाचे टोक तेलाच्या भांड्यात बुडवून देवीच्या महिरप (कमान) तेल लावले जाते. यावेळी तेलवणाचे गाणे म्हणत हि प्रकिया केली जाते. देवीला तेलवण लावल्यानंतर अशीच प्रक्रिया महादेवाच्या मंदिरात पार पडते. या सोहळ्यात यंदाही येमाई देवीचा व महादेवांचा विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत