शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

प्रतिकात्मक प्रेतासमोर ग्रामीण डाक सेवकांनी फोडला टाहो : अकराव्या दिवशी बोंबाबोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 18:05 IST

ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने केंद्र सरकार व डाक विभागाला मृत घोषित करण्यात आले. मुख्य डाक कार्यालया समोर केंद्र सरकार व डाक विभागाच्या प्रतिकात्मक प्रेता समोर ग्रामिण डाक सेवकांनी टाहो फोडून बोंबा मारल्या.

अहमदनगर : ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या अकराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने केंद्र सरकार व डाक विभागाला मृत घोषित करण्यात आले. मुख्य डाक कार्यालया समोर केंद्र सरकार व डाक विभागाच्या प्रतिकात्मक प्रेता समोर ग्रामिण डाक सेवकांनी टाहो फोडून बोंबा मारल्या.संपाचा दहावा दिवस उलटून देखील केंद्र सरकार व डाक विभाग ग्रामीण डाक सेवकांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने त्यांना मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. तर त्यांच्या प्रतिकात्मक प्रेता समोर आंदोलकांनी बोंबा मारुन आपला संताप व्यक्त केला. तर मृतांचा दहावा व तेरावा देखील संघटनेच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. डाक विभागाचे कामकाज केंद्र सरकारमार्फत चालून देखाल ग्रामीण डाक सेवकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली नाही. सदरील मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने ग्रामीण डाक सेवकांनी मंगळवार दि. २२ मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. डाक विभागाची संपुर्ण धुरा ग्रामिण डाक सेवकांवर असून, त्यांनाच हक्का पासून वंचित ठेवण्यात आले आहे. आंदोलन चालू असताना पोस्टचा कारभार ग्रामीण डाक सेवकांअभावी संपुर्णत: ठप्प झाला असून, मागण्या मान्य होत नाही तोपर्यंन्त संप चालूच राहणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंदराव पवार, सचिव एन.बी. जहागीरदार, कार्याध्यक्ष जी.टी. राजगुरु, अशोक बंडगर, लक्ष्मण बर्डे, विजयकुमार एरंडे, श्रीमंदिलकर टेके, सलिम शेख, भिमराज गीरमकर, दत्तात्रय कोकाटे, चंद्रकांत नेटके, सुदर्शन काकडे, खुडे काका, बी.डी. निंबाळकर, देवराम पालवे, क्षीरसागर, बाळासाहेब बनसोडे, टेके मॅडम, सुनिल शिंदे, संजय परभणे आदिंसह जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय