शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भंडारद-यात पर्यटकांचा ‘विकेंड’ : फेसाळते धबधबे, फॉलचे आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 12:55 IST

सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात रविवारी दिवसभर येथील निसर्गाचा मनोहारी आविष्काराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती.

प्रकाश महाले राजूर/भंडारदरा : सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी भंडारदरा परिसरात रविवारी दिवसभर येथील निसर्गाचा मनोहारी आविष्काराचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली होती.गेल्या पंधरा दिवसांहून अधिक दिवस भंडारदरा पाणलोटात धो-धो पाऊस कोसळत होता. त्यामुळे येथील निसर्गाला नवलाई चढली आहे. भंडारदरा धरणाच्या रिंग रोडवरील सह्याद्रीच्या गिरीशिखरांहून कोसळणाऱ्या धबधब्यांची श्रृंखलाच नजरेत भरत आहे. सर्वच धबधब्यांची फेसाळत कोसळण्याची जणू काही स्पर्धाच येथे सुरू झालेली आहे.तुडुंब भरलेली भात खाचरे, त्यातून ओसंडून वाहणारे पाणी, वेगाने वाहणारे ओढे, नाले यामुळे जलमय झालेला सर्वदूर परिसर, निसर्गाला आलेला तजेला आणि ओतप्रोत भरलेला भंडारदरा धरणाचा जलाशय डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी आता या परिसरात जिल्ह्याबरोबरच नाशिक, मुंबई, ठाणे, पुणे,औरंगाबाद आदी जिल्ह्यांतील पर्यटकांचा ओढा वाढू लागला आहे.रविवारी दिवसभर येथे पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे पर्यटकांना रविवारी मनमुरादपणे आनंद लुटता आला. घाटघर परिसरात येणाºया धुक्यामुळे काही काळ या धुक्यात गडप होणारा निसर्ग, त्यामागोमाग येणाºया वाºयाची झुळूक आणि त्यापाठोपाठ टपोºया थेंबांनी येणाºया पावसाची मोठी सर,या सरीमध्ये आणि जागोजागी पडणाºया धबधब्यांच्या खाली ओलेचिंब होण्याचा मोह पर्यटकांना आवरत नसल्याचे दिसून येत होते. रतनवाडी जवळील फेसाळत कोसळणारा न्हाणी फॉलचा आनंद घेण्यासाठी पर्यटक तासन् तास रेंगाळलेले दिसत होते. त्यावरील बाजूला वन्यजीव विभागाने तयार केलेल्या लोखंडी पुलावर जाऊन आपल्या आठवणी मोबाईल कॅमेºयात बंद करण्यासाठी चढाओढ करीत होते. तेथून जवळच असणारा नेकलेस फॉल, पांजरे फॉल व इतर धबधब्यांंच्या ठिकाणीही रविवारी पर्यटकांची गर्दी दिसत होती. एकूण या आठवड्यात पुन्हा पंधरा आॅगस्ट आणि त्यालाही जोडून येणाºया सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.रविवारी दिवसभर पावसाचा जोर ओसरला होता. त्यामुळे धरणांमध्ये येणा-या नवीन पाण्याची आवकही मंदावली होती. यामुळे धरणांमधून सोडण्यात येणा-या पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला.भंडारदरा धरणातून दिवसभर ५ हजार ७४८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. तो सायंकाळी सहा वाजता कमी करत ४ हजार ६०० क्युसेक करण्यात आला. निळवंडे धरणातून १० हजार १२७ क्युसेकने पाणी प्रवरा पात्रात सोडण्यात येत होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले