श्रीगोंदा - एका अल्पवयीन मुलीचा अश्लील फोटो व्हिडीओ चित्रीकरण करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तिला यावरुन वारंवार ब्लॅकमेल करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली. याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीने रविवारी (१३ डिसेंबर) रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अत्याचार करणारा आरोपी रामदास मोरे याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.
आरोपी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची मुलीला वारंवार धमकी देत. तो मागील नऊ महिन्यापासून वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत असे, असे मुलीने फियार्दीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहेत.