लोकमत न्यूज नेटवर्कजामखेड (जि. अहमदनगर) : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचा २९२वा जयंतीसोहळा बुधवारी चौंडीत (ता. जामखेड) या जन्मगावी आयोजित करण्यात आला आहे. सोहळ्याला केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख राहणार असून, उत्तर प्रदेशचे मंत्री एस. पी. सिंग बघेल हेही या वेळी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन वॉटरप्रूफ भव्य मंडपाबरोबरच भोजन, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज चौंडीत अहल्यादेवी जयंती
By admin | Updated: May 31, 2017 03:49 IST