कॅन्सरला आमंत्रण : महिनाभरात तंबाखू सुटणे शक्यभाऊसाहेब येवले ल्ल राहुरीजगभर तंबाखू सेवनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ पासून ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला़ संघटनेच्या अहवालानुसार सन २०२० ते २०३० या कालावधीत जगातील १०० कोटी लोक तंबाखूपासून होणाऱ्या रोगामुळे मरतील़ याशिवाय तंबाखू सेवनाने मनुष्याचे आयुष्य तब्बल ९ ते ११ वर्षांनी कमी होईल. तंबाखूचा इतिहासही रोचक आहे. कोलंबसने तंबाखू जगभर पसरविण्याचे काम केले़ इंग्रजांबरोबर तंबाखूरुपी विषाचे भारतात आगमन झाले़ देशात ४ लाख हेक्टर क्षेत्रावर तंबाखूचे उत्पादन घेतले जाते़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे १२० प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात़ तंबाखू सेवनानंतर १५ ते २० मिनिटांत निकोटीन हा विषारी घटक शरीरात पोहोचतो़ तंबाखूमध्ये निकोटीन, कार्बन मोनॉक्साईड, टार, मार्श गॅस, अमोनिया, पायरिडीयन, कोलोडीन, कार्बोलिक अॅसिड, पॅराफिरोल आदी प्रकारचे विषारी घटक शरीरावर भयंकर दुष्परिणाम करतात़तंबाखू, बिडी, सिगारेट, तपकीर, गुटखा, मावा यांच्या सेवनाने आयुष्यमान ९ ते ११ वर्षांनी कमी होऊ शकते़ तंबाखूजन्य पदार्थांमुळे रक्ताच्या गुठळया तयार होतात़ हृदयाला रक्तपुरवठा करण्यास अडथळा होतो़ छातीत दुखणे, चक्कर येणे, मुंग्या येणे, अस्वस्थ वाटणे आदी लक्षणे दिसून येतात़ हृदयविकाराची शक्यता वाढते़ तंबाखूमुळे दृष्टिदोष, श्वसननलिकेला सूज येणे, दमा, खोकला वाढणे, कफ होणे, धाप लागणे या स्वरुपाचे विकार जडतात़अशी सोडा तंबाखू ...शंभर गॅ्रम ओवा व श्ांभर ग्रॅम बडीशोप तव्यावर तापवावी़ त्यावर एक लिंबू पिळावे़ हे मिश्रण तंबाखूची तलफ झाल्यानंतर खावे़पेरूचे पान घेऊन त्यामध्ये चमचाभर मध टाकून त्याचे दिवसातून तीन वेळा सेवन करावे़ओले खोबरे व कोथंबीर यांचे सेवन करावे़गूळ व कांदा एकत्र खावे़तंबाखू खावीशी वाटल्यास लिंबाचा पाला खावा़दररोज व्यायाम व चांगल्या पुस्तकांचे वाचन करावे़तंबाखू खाणाऱ्या मित्रांपासून दूर राहावे़तंबाखूची आठवण झाल्यानंतर उलटे आकडे मोजावेत़आवडते छंद जोपासावे़मनावरील ताबा हा तंबाखू सोडण्याचा सर्वांत उत्तम मार्ग आहे़झोपताना व उठताना ३५ दिवस या सूचना पाळाव्यात.तंबाखू खाणाऱ्यांच्या तोंडात पांढरा, लालसर चट्टा आला असेल, तोंड उघडण्यास त्रास होत असेल किंवा तोंडात झालेली जखम भरत नसेल तर ही मुखाच्या कर्करोगाची प्राथमिक लक्षणे असू शकतात. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. जेवढ्या लवकर उपचार होतील, तेवढ्या लवकर कर्करोग आटोक्यात येऊ शकतो. जनजागृती कॅन्सरला आळा घालण्यात मोठी भूमिका बजावू शकते.- डॉ. सतीश सोनवणे, कॅन्सरतज्ज्ञ.
तंबाखू सेवनाने होते ११ वर्ष आयुष्य कमी
By admin | Updated: May 30, 2016 23:53 IST