शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील अनुदानित वसतिगृहांमधील अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 20:38 IST

जवळपास वर्षभरापासून राज्यातील सुमारे आठशे अनुदानित वसतिगृहांना राज्य सरकारने एका रूपयाचेही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रातील सुमारे अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : जवळपास वर्षभरापासून राज्यातील सुमारे आठशे अनुदानित वसतिगृहांना राज्य सरकारने एका रूपयाचेही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रातील सुमारे अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.सरकारी अनुदान रोखून धरल्यामुळे संस्थाचालक वर्षभरापासून उधारी-उसनवारीवर आपली अनुदानित वसतिगृहे चालवित आहेत. उधारी-उसनवारी प्रचंड प्रमाणात थकली आहे. त्यामुळे या देणेक-यांचा पैशांसाठी वसतिगृह अधीक्षकांकडे तगादा वाढला आहे. सरकारी अनुदानाचे पैसे सरकार देत नसल्याने देणेक-यांची देणी भागवायची कशी?, त्यांचे पैसे द्यायचे कसे? या विवंचनेत या वसतिगृहांचे अधीक्षक आहेत.महाराष्ट्रात सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत २३८८ अनुदानित वसतिगृहे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून चालविली जातात. त्यातून १ लाख मुलामुलींच्या मोफत भोजन निवासाची व्यवस्था करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून प्रति विद्यार्थी दरमहा ९०० रूपये अनुदान दिले जाते. आजच्या महागाईच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रूपयांमध्ये एक दिवस नाश्ता, दुपार व संध्याकाळचे पोटभर सकस जेवण देणे सरकारला अपेक्षित आहे. वसतिगृहांना वर्षात दोन टप्प्यात अनुदान दिले जाते. जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यांचे आगाऊ अनुदान (अ‍ॅडव्हान्स ग्रँट) दिवाळीच्या सुमारास नोव्हेंबरमध्ये दिले जाते. तर उर्वरित डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या पाच महिन्यांचे अंतिम अनुदान मे महिन्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दिले जाते. पण वर्षभरापासून हे अनुदानच राज्यातील अनेक वसतिगृहांना मिळालेले नाही.

अनुदान का मिळत नाही?

सोलापूर जिल्ह्यात काही अनुदानित वसतिगृहांकडे मूळ मान्यतेचे आदेश नसल्याचे आढळल्यानंतर सामाजिक न्याय विभागाने राज्यभरातच अशा वसतिगृहांची तपासणी मोहीम हाती घेतली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेतील जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांना त्यांच्या अधिनस्त अनुदानित वसतिगृहांची तपासणी करुन, ज्या अनुदानित वसतिगृहांकडे मूळ मान्यता दिलेल्या आदेशाची प्रत नाही, त्यांचे अनुदान थांबविण्याचे आदेश २१ सप्टेंबर २०१५ ला समाजकल्याण आयुक्तांनी दिले.

अहमदनगर जिल्ह्यातील ८८ वसतिगृहांची सुनावणी होऊन ९ वसतिगृहांना अनुदान देण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यातील ७९ वसतिगृहांचे अनुदान राहिले आहे. अनुदान उपलब्ध आहे. लवकरच आदेश मिळताच ते वाटप होईल.-नितीन उबाळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर