शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विखेंची दादागिरी संपविण्याची हीच वेळ : संग्राम जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 12:40 IST

कॉँग्रेसकडून सत्तेची अनेक पदे ज्यांनी सांभाळली. अनेक वेळा स्वकियांना त्रास दिला.

संगमनेर : कॉँग्रेसकडून सत्तेची अनेक पदे ज्यांनी सांभाळली. अनेक वेळा स्वकियांना त्रास दिला. सहकाराच्या माध्यमातून सगळीकडे हुकूमशाही राबविली. त्यांची दादागिरी संपविण्याची ही योग्य वेळ आहे. आम्ही दक्षिणेत योग्य इंजेक्शन दिले. आता तुम्ही उत्तरेत द्या, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ गुरूवारी तालुक्यातील जोर्वे येथे आयोजित सभेत जगताप बोलत होते. यावेळी शिवाजी दिघे, शांताबाई खैरे, विठ्ठल काकड, संपत थोरात, सुरेश थोरात आदी उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सातत्याने सत्तेत राहून त्या परिवाराने अनेक पदे भोगली आहेत. पण निष्ठा त्यांनी कधी दाखवली नाही. वेळ आली तशी पाठ फिरवली आहे. यावेळेस दक्षिणेत त्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखविली आहे. आताही उत्तरेतील जनतेला संधी आहे. या घराण्याची दादागिरी हुकूमशाही कायमची संपवा. काँग्रेस पक्षाने कायम सर्वांना घेत विकासाचे राजकारण केले आहे. मात्र, याला हे घराणे अपवाद ठरले. यांनी पक्षाचे नाव वापरून स्वत:चा पक्ष तयार केला आहे. जिल्ह्यातून त्यांना कायमचे हद्दपार करायचे आहे. आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासारखा गरीब माणूस काँग्रेस पक्षाने उमेदवार दिला आहे. साधा व सरळ माणूस आहे. त्यांना साधी, प्रामाणिक माणसे चालत नाहीत. विखे कुटुंबाची हाजीहाजी करणारेच लागतात म्हणून आमदार कांबळे यांच्याविरुद्ध हे उभे ठाकले आहेत. त्यांना अजिबात थारा देऊ नका. आमदार कांबळे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार आहेत. दक्षिणेत व उत्तरेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार विजयी होतील. यामुळे या घराण्याचा पराभव नक्की असून हीच संधी चालून आली आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019