शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

शताद्बी वर्षातही टिळकांचे स्मृतिस्थळ दुर्लक्षित

By साहेबराव नरसाळे | Updated: May 9, 2019 12:03 IST

पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़

साहेबराव नरसाळेअहमदनगर : पश्चिम हिंदुस्तानचे टागोर, महाराष्ट्राचे वर्डस्वर्थ, महाराष्ट्राचे शेवटचे संतकवि आणि फुला-मुलांचे कवी अशी ख्याती असलेले रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे नगरमधील स्मृतिस्थळ एक शतकाचा काळ उलटला तरी दुर्लक्षितच राहिले आहे़ महाराष्ट्रात एकमेव असलेल्या या स्मृतिस्थळाचा विकास व्हावा, अशी मागणी अभ्यासकांमधून होत आहे़रत्नागिरी जिल्ह्यातील करजगाव येथे ६ डिसेंबर १८६१ रोजी चित्पावन ब्राम्हण कुटुंबात नारायण टिळक यांचा जन्म झाला़ पुढे त्यांनी तुकाराम नत्थुजी धेंडे यांच्या हातून १० फेब्रुवारी १८९५ रोजी बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला़ टिळक १८८६ साली नगरला आले आणि पुढे २५ वर्षे नगरमध्येच वास्तव्यास होते़ नगरमध्ये जुन्या वसंत टॉकीजजवळ फर्ग्युसन गेट या ठिकाणी राहत होते़ याच काळात नगर येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ या ख्रिस्ती धर्माच्या विख्यात मासिकाचे ते ७ वर्षे संपादक होते. ३१ आॅगस्ट १९०४ रोजी राहुरीत ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून दीक्षाही घेतली आणि रेव्हरंड ही उपाधी त्यांना मिळाली़ राहुरी येथे त्यांनी गरीब व गरजू लोकांसाठी ‘ख्रिस्त सदन’ची उभारणी केली़ रेव्हरंड टिळक यांच्यासोबत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हेही नगरमध्ये वास्तव्यास होते़ रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई यांनी बालकवींचा सांभाळ केल्याचे सांगितले जाते़ ख्रिस्ती धर्मातील ‘उपासना संगीत’ या पुस्तकातील अनेक गीते टिळकांनी नगरमध्येच लिहिली़ मराठी ख्रिस्ती साहित्यात त्यांनी ‘ख्रिस्तायन’ हे महाकाव्य लिहिले़ यातील काही भाग त्यांनी नगरमध्ये व काही साताºयामध्ये लिहिला आहे़ ९ मे १९१९ साली टिळकांचे मुंबई येथे निधन झाले़ त्यांच्या मृत्युपत्रात नगरमध्ये अस्थींचे दफन करण्यात यावे, अशी इच्छा व्यक्त केली होती़ त्यानुसार नगरमध्ये अस्थींचे दफन करण्यात आले व तेथे त्यांचे स्मृतिस्थळ बांधण्यात आले़ या स्मृतिस्थळाभोवती पूर्वी लोखंडी कंपाउंड होते़ मात्र, त्याचे लोखंड काही लोकांनी चोरुन नेले होते़ त्यामुळे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त फेबु्रवारी २०१९ मध्ये या स्मृतीस्थळाची रंगरंगोटी करण्यात आली़ टिळकांच्या साहित्याचे अभ्यासक वर्षभर त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात़ टिळकांच्या साहित्यावर अनेकांनी डॉक्टरेट मिळविलेली आहे़ लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रा’त नगरचा उल्लेख आहे़ ते वाचल्यानंतर अनेक अभ्यासक नगरला येतात़ स्मृतिस्थळास भेट देतात़ त्यामुळे या स्मृतिस्थळाचा विकास होणे आवश्यक आहे, असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे़स्मृती शताद्बी वर्षानिमित्त टिळकांचे दुर्लक्षित असलेले स्मृतिस्थळ विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे़ त्यासंदर्भात लवकरच नियोजन करुन पुढील दिशा ठरविण्यात येईल़ -संजय आढाव, टिळकांच्या साहित्याचे अभ्यासक

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय