अहमदनगर : शहरातील केडगावसह पाईपलाईन रोड व दर्गादायरा परिसरात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास धुमाकूळ घालत चार दुकाने व दोन ठिकाणी घरफोडी करत दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला़ केडगाव येथे तर पोलीस चौकी समोरील दुकाने चोरट्यांनी फोडल्याने पोलिसांचा धाक उरला की, नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे़ शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़ केडगाव उपनगरात नगर पुणे राज्यमार्गालगत केडगाव पोलीस चौकी आहे. या चौकीच्या समोरच शिवसागर किराणा दुकान व अन्य दुकाने आहेत. रात्रभर वर्दळ असणाऱ्या या भागात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शिवसागर हे किराणा दुकान फोडले या दुकानातून जवळपास रोख रकमेसह ६० ते ७० हजार रुपयांचा माल लंपास केला़ यावेळी चोरट्यांनी शेजारी कुशल भंडारी, मारुती म्हसे, गिरीश तकेकर यांचीही दुकाने फोडली़ त्यानंतर चोरट्यांनी दुकानाशेजारी असलेली घरे फोडण्याचा प्रयत्न केला़ या प्रकरणी बबन लक्ष्मण वाठोळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)मध्यरात्रीस खेळ चाले मंगळवारीच मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील पाईपलाईन रोडवरील श्रमिकनगर परिसरात चोरट्यांनी घराच्या हॉलचा दरवाजा तोडून ७३ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास केली़ या प्रकरणी राहुल राजेंद्र पांढरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ भिंगार येथील दर्गादायरा परिसरातील सीआयव्ही हौसिंग सोसायटीतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी ३ हजार रुपयांच्या रोख रकमेसह एक महागडे घड्याळ व व चांदीचे दागिने लंपास केले़ या प्रकरणी नासिर अहमद आदमखान यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ चोरट्यांनी तिनही ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास चोऱ्या केल्या़ चोरट्यांचा रात्री चाललेला हा खेळ पेट्रोलिंग करत असलेल्या पोलिसांच्या कसा लक्षात आला नाही़ असा प्रश्न उपस्थित होत आहे़ चोरट्यांनी केडगाव येथील शिवसागर किराणा दुकानात प्रवेश केल्यानंतर तेथील रोकड लंपास केली़ तसेच दुकानातील सामानाची उचकापाचक करत काजू आणि बदामावर चांगलाच ताव मारला़ इतर खाण्याच्या वस्तू घेऊन पोबारा केला.घटनांचा तपास नाही ४यापूवीर्ही केडगावमध्ये रात्रीतून दुकाने फोडून ऐवज लंपास करण्याचे अनेकदा प्रकार घडले आहेत. या घटनांची पोलीस दप्तरी नोंदही आहे मात्र या घटनेला अनेक वर्ष उलटूनही यातील एकाही चोरीचा तपास लागला नाही.
नगर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 17:49 IST