शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेला पितृपक्ष आडवा

By admin | Updated: November 6, 2023 13:04 IST

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते.

अहमदनगर : पितरांना तृप्त करणारा भाद्रपद पंधरवाडा कार्यासाठी अशुभ असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला तर पितृपक्षातच अर्ज दाखल करावे लागतील, अशी धास्तीच इच्छुकांनी घेतली आहे. घटस्थापना झाल्यानंतरच्या काळात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू व्हावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. लागणार, लागणार ती आचारसंहिता अद्यापही लागली नसल्याने राजकीय नेते-कार्यकर्त्यांची ‘काक’दृष्टी आता निवडणूक कार्यक्रमाकडे लागली आहे.श्री. गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीच राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल, असे अपेक्षित होते. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वांनाच हुलकावणी दिली. होणार होणार म्हणून होणारी आयोगाची पत्रकार परिषद झालीच नसल्याने अनेकांचा जीव टांगणीला लागला. ९ सप्टेंबरला आचारसंहिता लागली असती तर कदाचित अर्ज विकत घेण्याची प्रक्रिया पितृपक्षातच सुरू झाली असती, अशी धास्ती अनेकांना होती. भारतीय संस्कृतीमधील पितृपक्षाला असलेले महत्त्व आणि या काळात टाळली जाणारी शुभ कामे यामुळे आचारसंहिता जाहीर करण्याचा मुहूर्तही पुढे ढकलला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आज-उद्या आचारसंहिता जाहीर झाली तरी निवडणूक प्रक्रिया ही घटस्थापनेनंतर सुरू होईल, अशीच दुसरी शक्यताही व्यक्त होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन राज्यातील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगितल्याने कोणते ती दोन राज्ये अशी शंकाही अनेकांनी व्यक्त केली. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये सध्याची पूरपरिस्थिती पाहता तेथे निवडणूक होण्याची शक्यता नसल्याने महाराष्ट्रात कोणत्याही परिस्थितीत एक-दोन दिवसात आचारसंहिता लागेल, या आशेवरच सर्वजण आहेत. आपल्या पितरांची आठवण व्हावी, अशी भावना पितृपक्षामध्ये असते. याबाबत अनेक मतभेद आहेत. पितरांच्या नावाने पिंडदान, श्राद्ध घातले जात असल्याने शुभकार्य टाळण्याकडेच अनेकांचा कल आहे. (प्रतिनिधी)