शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांमध्येही घेतला जाणार कोरोनाचाचणीसाठी घशातील स्त्राव, जिल्हाधिकाºयांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 11:58 IST

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खासगी प्रयोगशाळांना स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे तपासणी जलदगतीने होईल आणि रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करता येतील, या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अहमदनगर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खासगी प्रयोगशाळांना स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी मान्यता दिली आहे. यामुळे तपासणी जलदगतीने होईल आणि रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करता येतील, या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या खासगी प्रयोगशाळेत नागरिकांचे स्वॅब घेतले जात नाहीत. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास संबंधित नागरिक थेट जिल्हा रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेतो. त्याचा अहवाल येईपर्यंत संबंधित नागरिकाला जिल्हा रुग्णालयातच ठेवले जाते. यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनावरील ताणही वाढला आहे. यामुळे जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आता खासगी प्रयोगशाळांना स्वॅब घेण्यास मुभा दिली आहे. रविवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, खासगी रुग्णालय, खासगी प्रयोगशाळा (लॅब) यांना कोविड-१९ च्या अनुषंगाने नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविणेकामी व नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या रुग्णांचे, व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त होईपर्यंत संस्थात्मक विलगीकरणाबाबत निर्देश दिले आहेत. प्रतिबंधात्मक भाग म्हणून प्रयोगशाळांमध्ये जलद चाचणी  केल्यास बाधित रुग्णांवर तातडीने उपचार करता येतील. 

स्वॅब घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची गरज नाहीच्आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळेत कोविड-१९ तपासणीसाठी डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनची आवश्यकता राहणार नाही. संबंधित प्रयोगशाळांना स्वॅब घेतलेल्या व्यक्तींची माहिती, तसेच कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती व अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी यांना रोज कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच संबंधित माहिती आरटीपीसीआर अ‍ॅपवर टाकणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लक्षणे असतील तर रुग्णालयात भरतीच्खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना कोविड-१९ ची लक्षणे असणाºया व्यक्तींची तपासणी करावयाची असल्यास स्वॅब घेतल्यानंतर  त्या रुग्णास रुग्णालयात भरती करणे आवश्यक राहील. लक्षणे नसणाºया व्यक्ती, कोविड-१९ पॉझिटिव्ह सहवासीत व्यक्ती, शस्त्रक्रिया पूर्व व्यक्ती खासगी प्रयोगशाळेत कोविड-१९ तपासणी करावयाची असल्यास संबंधितांना स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता नाही. च्मात्र त्यांना अहवाल येईपर्यंत होम क्वारंटाईन आवश्यक राहणार आहे. संबंधित खासगी प्रयोगशाळांनी होम क्वारंटाईनचा शिक्का हातावर मारणे बंधनकारक राहील. पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती तातडीने निकटचे शासकीय रुग्णालयांना कळविणे, तसेच त्यांना ‘आयसोलेशन’मध्ये भरती होणे गरजेचे राहणार आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या